महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोविड कचरा ठेवला रस्त्यावर; कोल्हापुरातील सुर्या रुग्णालयाला पाच हजाराचा दंड - कोल्हापुरातील कोरोना सुर्या हॉस्पिटल

कोरोना कचरा उघड्यावर ठेवल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता असताना सुर्या हॉस्पिटलने कोविड तसेच जैव वैद्यकीय कचरा रस्त्यावर ठेवल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब समोर आली होती. कोल्हापूर महापालिकेच्या पथकाने तत्काळ संबंधित रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Sep 19, 2020, 6:01 AM IST

कोल्हापूर -कोल्हापुरातील सुर्या हॉस्पिटलने कोविड तसेच जैव वैद्यकीय कचरा रस्त्यावर ठेवल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब समोर आली होती. याची गंभीर दखल घेत कोल्हापूर महापालिकेच्या पथकाने तत्काळ संबंधित रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली आहे. या प्रकरणी पाच हजार रुपये दंड पालिकेने ठोठावला आहे.

लक्ष्मीपुरी परिसरातील कोंडाओळ येथील सुर्या हॉस्पिटलने कोविड कचरा रस्त्यावर आणून उघड्यावर ठेवला असल्याची महापौर निलोफर आजरेकर यांना ऑनलाइन माहिती मिळाली होती. ही गंभीर बाब असल्याचे म्हणत महापौर आजरेकर यांनी तत्काळ महानगरपालिकेच्या पथकाला पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पालिकेच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली.

महापालिका दंड पावती

शहरातील सर्वच रुग्णालयांनी त्यांच्याकडील कोविड कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करणे बंधनकारक आहे. असे असताना कोविड कचऱ्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करून कोविड कचरा रस्त्यावर उघड्यावर ठेवणे ही बाब अतिशय गंभीर असून यापुढे सर्वच रुग्णालयांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही महापौर निलोफर आजरेकर यांनी केले आहे.

हेही वाचा -राज्यात दिवसभरात २१ हजार ६५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४०५ मृत्यू

हेही वाचा -हृदयद्रावक..! आठ महिन्याचे बाळ झाले पोरके, वीज पडल्याने आई-वडिलांचा जागीच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details