कोल्हापूर - श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आज शुक्रवारी संपन्न झाला. मात्र, यंदाही कोरोनाचा महामारीमुळे मंदिर परिसर बंद आहे. त्यामुळे यंदाही सुद्धा भक्तांविना दक्षिणद्वार सोहळा झाला आहे.
श्री क्षेत्र नृसिंहवाडीत पार पडला पहिला दक्षिणद्वार सोहळा - kolhapur news
कृष्णा नदीच्या पाण्याने शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिरातील दत्त पादुकांना स्पर्श केले. येथील दत्त मंदिरात मध्यरात्री अडीच वाजता नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रींच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडे बाहेेेर पडले. त्यामुळे या वर्षातील हा पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’ झाला.
यंदाही भक्तांविना दक्षिणद्वार सोहळा
दोन दिवसांपासून कोल्हापूरसह जिल्हाभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच राधानगरी धरणातून सुद्धा 2 जूनपासून विसर्ग सुरू आहे. यामुळे येथील कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या पाण्याने शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिरातील दत्त पादुकांना स्पर्श केले. येथील दत्त मंदिरात मध्यरात्री अडीच वाजता नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रींच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडे बाहेेेर पडले. त्यामुळे या वर्षातील हा पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’ झाला. या दक्षिणद्वार सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी शेकडो भाविकांची गर्दी होत असते. मात्र मंदिर परिसर कोरोनामुळे बंद असल्याने भक्ताना येता आले नाही. त्यामुळे जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे अशी सर्वच भक्त प्रार्थना करत आहेत.