महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापुरातील एसटी वर्कशॉपमधील भंगाराला आग, मोठा अनर्थ टळला - कोल्हापूर ताराबाई पार्कमधील वर्कशॉपच्या भंगाराला आग

आज ताराबाई पार्कमधील वर्कशॉपच्या भंगाराला आग लागली. शॉपच्या मागील बाजूला असणाऱ्या भंगाराला कचरा पेटवल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वेळीच प्रसंगावधान राखत एसटीच्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण करून ही आग आटोक्यात आणली.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Feb 2, 2021, 4:22 PM IST

कोल्हापूर- एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे आज ताराबाई पार्कमधील वर्कशॉपच्या भंगाराला आग लागली. शॉपच्या मागील बाजूला असणाऱ्या भंगाराला कचरा पेटवल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वेळीच प्रसंगावधान राखत एसटीच्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण करून ही आग आटोक्यात आणली.

कोल्हापूर

आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ताराबाई पार्कमधील एसटी वर्कशॉपमध्ये आग लागल्याची घटना घडली. वर्कशॉपमधील भंगाराला आग लागल्याचे समोर आले. याठिकाणी पेटवलेल्या कचऱ्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सकाळी एक वाजण्याच्या सुमारास भंगार ठेवलेल्या ठिकाणाहून धुराचे लोट येताना दिसले. थोड्यावेळात आगीने रोद्ररूप धारण केले. मात्र, प्रसंगावधान राखत अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत फायर बॉक्सचे फवारे मारत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशमन दलांचे जवान आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मोठा अनर्थ टळला..

घटनास्थळापासून या काही अंतरावरच जळक्या ऑईलने भरलेले बॅरेल ठेवण्यात आले होते. ही आग आटोक्यात आली नसती तर याची धग या बॅरेलपर्यंत पोहोचून मोठा भडका उडण्याची शक्यता होती. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणली.

ABOUT THE AUTHOR

...view details