कोल्हापूरयंदा कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरी होत आहे. Ganeshotsav 2022 याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस आणि गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन मिरवणूक मार्ग संदर्भात बैठक पार पडली आहे. Kolhapur Superintendent Police दसरा चौकातील शाहू स्मारक सभागृह येथे ही बैठक घेण्यात आली होती. Information of Superintendent Police दरवर्षी महाद्वार रोडवरून गणेश विसर्जनाची मिरवणूक निघत असते. The procession route decided त्यानुसार यंदा ही हाच पारंपारिक मिरवणूक मार्ग सुरू ठेवण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले आहे. Ganesh festival in Kolhapur मात्र सोबतच या मार्गावर गर्दी होऊ नये. याकरिता अन्य 2 मिरवणूक मार्ग ही या वर्षापासून सुरू करत असून या नवीन मार्गावरून ही मिरवणूक नेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी यावेळी केले आहे.
चर्चांना उधाणकोल्हापुरात गणपती विसर्जनाचे बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा पारंपरिक मिरवणुकीचा मार्ग आहे. मात्र यंदा मार्गासंदर्भात वेगवेगळया चर्चांना उधाण आले होते. म्हणून मिरवणूक मार्ग संदर्भात आज कोल्हापूर पोलीस आणि गणेशोत्सव मंडळ यांच्यात बैठक पार पडली. यावेळी या बैठकीस कोल्हापुरातील मंडळाच्या पदाधिकऱ्यांनसह सामाजिक संस्था, संघटना, विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. दर वर्षी महाद्वार रोड परिसरात होणारी गर्दी आणि यात काही अपघात घडल्यास पोलिसांना गर्दीतून त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा विलंब यामुळे यंदाच्या वर्षी कोल्हापूर पोलिसांनी पारंपारिक मार्गांबरोबरच अन्य दोन नवीन मिरवणूक मार्ग सुरू केले आहे.