कोल्हापूर -जिल्ह्यातील बीड गावात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. २६ जानेवारीपासून गावत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी १४ दिवसांपासून शेतकऱ्यांचा ठिय्या - News about debt forgiveness
कोल्हापूर जिल्ह्यातील बीड गावात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन २६ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे.
सात बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी १४ दिसांपासून 'या' गावात शेतकऱ्यांच्या ठिय्या
या आंदोलनाचा आज १४ वा दिवस आहे. मात्र, तरीही या आंदोलनाची कोणीही दखल घेतलेली नाही. या आंदोलकांनी संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला आहे.