महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ex MLA Rajesh Kshirsagar : झाडाच्या पानाला तुम्हींच किड लावलीतर ते पाने गळूनच पडतील'; राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त खदखद - Uddhav Thackeray

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत मी एवढा मोठा त्याग केला मात्र पक्षाला माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, अशी खदखद राजेश क्षीरसागर ( Ex MLA Rajesh Kshirsagar ) यांनी जाहीरपणे आज बोलून दाखविली.

Ex MLA Rajesh Kshirsagar
राजेश क्षीरसागर

By

Published : Jul 26, 2022, 5:57 PM IST

कोल्हापूर - एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची खदखद आता बाहेर पडू लागली ( Ex MLA Rajesh Kshirsagar ) आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत मी एवढा मोठा त्याग केला मात्र पक्षाला माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, अशी खदखद राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे आज बोलून दाखविली. या विधानामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार ( Rajesh Kshirsagar On Sanjay Pawar ) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला कोल्हापुरातूनच राजेश क्षीरसागर यांच्याकडून विरोध होता हे आता स्पष्ट झाले आहे.

राजेश क्षीरसागर यांची प्रतिक्रिया

बंडाचे परिणाम स्थानिक राजकारणात -शिवसेनेमध्ये बंड करत एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदार फोडले. याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातही झाला असून कोल्हापूर शिवसेनेमध्ये ही आता मोठी खिंडार पडली आहे. कोल्हापूरचे विद्यमान दोन खासदार आणि आमदार यांच्यासोबत माजी आमदार राजेश क्षीरसागर हे शिंदे गटाला जावून मिळाले. यावेळी आपण हिंदुत्वाच्या मुद्यांवर भाजप सोबत गेलो असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता हळूहळू सर्वांची खरी खदखद समोर येत असून माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी अखेर त्यांच्या मनातील खदखद आज बाहेर काढली.

त्याग केला मी मात्र फळ दुसऱ्यालाच -कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता मात्र दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लागली आणि तेथे मी जिंकून आलो असतो मात्र एवढे असतानाही मातोश्रीचा आदेश म्हणून मी पोट निवडणूक लढवली नाही एवढा मोठा त्याग मी केला मात्र तरीही राज्यसभेच्या निवडणुकी वेळी माझा विचार न करता पक्षाने संजय पवार यांना उमेदवारी दिली अशी खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात संजय पवार यांनी पक्षाला कधीच साथ दिली नाही. तरीही त्यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्याचे फळ त्यांना मिळालेच ते निवडून आले नाहीत. तसेच ज्यांची जनतेतून निवडून यायची लायकी नाही त्यांनीच पक्ष संपवल्याची टीका त्यांनी केली. तर आम्ही शिवसेना प्रमुखांना सोडले नाही आणि सोडणार नाही. पण, पक्ष कसा चालवावा हे शरद पवार यांच्याकडून शिकावे, अशी टीका राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

हेही वाचा -Patliputra Express Accident : पाटलीपूत्र एक्सप्रेसची कपलींग तुटली; अर्धी ट्रेन गेली पुढे, अर्धी राहिली मागे

ABOUT THE AUTHOR

...view details