कोल्हापूर - प्रकाशाचा सण म्हणून भारतात दिवाळी सण साजरा केला जातो. या आनंदोत्सवाची प्रतिवर्षी प्रत्येकजण मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतो, त्यामध्ये लहान मुलांसह मोठ्यांना विशेषत: फटाके फोडण्याचे नेहमीच आकर्षण असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिवाळीमध्ये दररोज केवळ 2 तासच फटाके वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेही केवळ ग्रीन फटाकेच फोडून यंदाची दिवाळी साजरी करावी लागणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा मात्र, फटाके विक्रेते आणि निर्माण कंपन्यांना याचा फटका बसला आहे. एकदंरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यावरील या बंदीचा व्यावसायिकांना कशापद्धतीने फटका बसला, यावरचा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..
फटाके वाजवा दोन तासचं..! प्रदूषणाला आळा; मात्र विक्रेत्यांना सोसाव्या लागणार आर्थिक झळा - कोल्हापूर दिवाळी फटाके विक्रेते
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसल्याने आणि दिवाळीतील फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आणि संबंधित जिल्हा प्रशासनाने फटाके फोडण्यासाठी वेळेच बंधन घातले आहे. प्रदुषणावर नियंत्रण आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी फटाके व्यावसायिकांना मात्र, यान निर्णयाचा मोठा फटका बसला आहे
फटाके वाजवा दोन तासचं..
दरवर्षी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात नागरिक फटाके वाजवत असतात. सायंकाळ होताच रात्री उशिरापर्यंत फटाक्यांचा आवाज सुरूच असायचा. शिवाय प्रदूषणामध्ये सुद्धा प्रचंड वाढ व्हायची. मात्र यंदा कोरोनाने जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच आता प्रशासनाने काही कडक पावले उचलली आहेत. कोरोना हा श्वसनाच्या संबंधिताचा विकार असल्यामुळे प्रदुषणावर नियंत्रण राहावे म्हणून प्रशासनाने दररोज केवळ 7 ते 9 या या वेळेतच फटाके वाजविण्याची परवानगी दिली आहे.
Last Updated : Nov 12, 2020, 8:08 PM IST