कोल्हापूर -कोल्हापूरातील कॉमर्स कॉलेज परीसरातील आझाद चौक येथे 'विलन्स अड्डा' नावाने एक नवीन कॅफे ( Unique cafes In Kolhapur ) सुरू झालं आहे. सत्यजित महाडिक, राजेश नलवडे आणि रमीज मुल्लाणी या तिघांनी मिळून हे कॅफे सुरू केले आहे. त्यामध्ये एक दोन नव्हे तर 7 ते 8 प्रकारचे वडापाव मिळत आहेत. त्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे. फक्त एकापेक्षा जास्त प्रकारचे वडापाव ( Wada Pav ) मिळतात म्हणून याची चर्चा नाहीये तर या सर्व वडापाव ना दिलेल्या नावामुळे याची चर्चा सुरू आहे. कारण या वडापावला महेश कोठारे यांच्या चित्रपटातील अनेक पात्रांची नावं दिली आहेत. ज्यामध्ये कुबड्या खविस वडापाव, माझा छकुला वडापाव, तात्या विंचू वडापाव, शाकाल वडापाव, कवट्या महाकाल वडापाव, टकलू हैवान वडापाव असे अनेक वडापाव नागरिकांना मिळणार आहेत. या अनोख्या नावांमुळे याची कोल्हापूरात चर्चा सुरू आहे.
महेश कोठारेंच्या चित्रपटातील नावे - खरंतर बर्गर अनेक व्हरायटीमध्ये मिळतात. त्यामुळे ते आपण पाहिले आहेत तसेच ते खाल्ले सुद्धा आहेत. या सर्वांची नावे इंग्रजीमध्येच असतात. अनेकदा तर नाव वाचता सुद्धा येत नाही. मात्र, 'विलन्स अड्डा'मधील तिघांनी मिळून चक्क 'वडापाव बर्गर' निर्माण केला आहे. त्यामध्ये सुद्धा 3 ते 4 फ्लेवर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे सर्व पिझ्झा दिसायला तर वेगवेगळे आहेतच शिवाय त्याची टेस्ट सुद्धा वेगवेगळी आहे. यामध्ये धांगडधिंगा पिझ्झा, अप्पा डँबीस पिझ्झा आणि छोटा डँबीस पिझ्झा अशी अनेक नाव देण्यात आली आहेत. इतर कॅफेमध्ये असलेल्या इंग्रजी नावांपेक्षा ही सर्व नाव अनोखी आहेत. ही सर्व नावे महेश कोठारे यांच्या चित्रपटातील अनेक पात्रांची दिली आहेत. आजही हे सर्व चित्रपट आणि या चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यामुळे तीच नावे वापरून या तरुणांनी आपले कॅफे सर्वांपेक्षा अनोखे बनवले आहे.