महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापूर : प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची 92व्या वर्षी कोरोनावर मात - एनडी पाटील ताज्या बातम्या

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी वयाच्या 92व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. जवळपास 10 ते 12 दिवस ते कोरोनाविरुद्धची लढाई लढत होते. त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीपुढे कोरोनाही हरला. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाच्या 61व्या वाढदिवसाच्या एक दिवस आगोदर त्यांनी कोरोनावर मात करून घरी परतल्याने पत्नी सरोज पाटील यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.

Dr N D Patil recover from Corona
प्रा.डॉ. एन. डी. पाटील यांनी वयाच्या 92 व्या वर्षी कोरोनाला हरवले

By

Published : May 18, 2021, 2:49 PM IST

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी वयाच्या 92व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. जवळपास 10 ते 12 दिवस ते कोरोनाविरुद्धची लढाई लढत होते. त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीपुढे कोरोनाही हरला. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाच्या 61व्या वाढदिवसाच्या एक दिवस आगोदर त्यांनी कोरोनावर मात करून घरी परतल्याने पत्नी सरोज पाटील यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.

10 ते 12 दिवस कोरोनाशी झुंज -

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची प्रकृती थोडी बिघडली होती त्यामुळे त्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, थोडी धाप आणि खोकला असल्याने पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना तत्काळ कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. सोमवारी 17 मे रोजी त्यांच्या लग्नाचा 61वा वाढदिवस होता. एक दिवस आधी त्यांनी कोरोनावर मात केली. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबईजवळच्या समुद्रात अडकलेल्या १७७ जणांना नौदलाने वाचवले; पाहा व्हिडिओ..

ABOUT THE AUTHOR

...view details