कोल्हापूर - शेतीला जोड व्यवसाय म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी दूध उत्पादनाचा व्यवसाय करतात. जिल्ह्यात सर्रास प्रत्येकाच्या घरात गायी, म्हशी पाहायला मिळतात. आपल्या प्राण्यांची कुटुंबातील एखाद्या सदस्यांप्रमाणेच ते काळजी घेत असतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून, एका शेतकरी कुटुंबाने आपल्या गायीचा ओटी भरणीचा कार्यक्रम ठेवल्याने त्यांचे आपल्या प्रण्यांप्रती असलेले प्रेम यातून दिसून आले आहे.
पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे गावचे शेतकरी
कोल्हापूरातल्या पन्हाळा तालुक्यातील गोलीवडेमधील सुशांत संजय जाधव यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून पाळीव प्राणी आहेत. या प्राण्यांचे त्यांच्या कुटुंबात एक वेगळं स्थान आहे. यावेळी त्यांनी आपल्या खिलार जातीच्या गायीच्या ओटीभरणीचा कार्यक्रम करायचे ठरवले. त्यांच्या पत्नी कोमल सुशांत जाधव यांनी सुद्धा तत्काळ होकार देत गायीच्या ओटीभरणीची तयारी केली आणि अगदी महिलांचा ओटीभरणी कार्यक्रम असतो तसा कार्यक्रम साजरा केला.