कोल्हापूर -भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये समजूतदारपणा असून दोन्ही संघातील खेळाडू प्रामाणिक आणि देशाचा प्रेमाखातीर खेळतात. त्यामुळे रविवारी भारत-पाकिस्तान मॅच झाली पाहिजे असे मत माजी क्रिकेटर सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. एका खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या किरमाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी भाष्य केले आहे.
टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. 24 ऑक्टोंबर रोजी भारत पाकिस्तान हा सामना रंगणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरून हा सामना खेळला जाऊ नये. यावरून देशात वाद सुरू आहे. भारत-पाक सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे माजी खेळाडू पद्मश्री सय्यद किरमाणी यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. सय्यद किरमाणी हे 1983 चाली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट विंडीज विरोधात विजय मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आज ते एका खाजगी कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला.