कोल्हापूर- डॉक्टर तरुणीने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर ( Doctor commits suicide in Kolhapur ) आला आहे. डॉ. अपूर्वा प्रविणचंद्र हेंद्रे (वय 30, रा. ताराबाई पार्क) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे ( Dr Apurva Hendre suicide ) नाव आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. हातामध्ये इंजेक्शन अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यादृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.
डॉक्टर अपूर्वा हेंद्रे यांनी नेमके कसले इंजेक्शन घेतले, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. आत्महत्या करण्यामागचे कारणही पोलीस शोधत आहेत. कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रविणचंद्र हेंद्रे ( Dr Pravinchandra Hendre daughters suicide ) यांची ती मुलगी आहे.
रात्रीपासून बेपत्ता, सकाळी मृतदेह फुटपाथवर -दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अपूर्वा हेंद्रे ही सर्जन होती. कोल्हापुरातल्या एका हॉस्पिटलमध्ये ती प्रॅक्टिस करत होती. रात्री एका कार्यक्रमासाठी ती घराबाहेर पडली होती. कार्यक्रमातून ती उशिरा परत घरी आली. काही वेळानंतर पुन्हा ती घरातून बाहेर पडली. जाताना घराचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. त्यानंतर आई वडिलांना सुद्धा याबाबत काहीतरी शंका आल्याने त्यांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता पुढील दरवाजा बंद होता. त्यांनी मागील दरवाजाने बाहेर जाऊन अपूर्वाचा शोध घेतला. मात्र ती कुठेही भेटली नाही.
पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद- शेवटी सकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये डॉ. प्रविणचंद्र हेंद्रे तक्रार देण्यासाठी गेले असता त्याठिकाणी त्यांना फोन आला. त्यांची मुलगी डी मार्ट परिसरातील एका फुटपाथवर पडली असल्याचे सांगितले. त्यांनी आणि पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अपूर्वाच्या हातामध्ये इंजेक्शन अडकलेल्या अवस्थेतच होते असे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ तिला सीपीआर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. दरम्यान, अपूर्वाचा पर्समध्ये एक औषधाची बाटली आणि दोन इंजेक्शन मिळाले. त्यामुळे त्यातीलच हे औषध होते का? आणि ते औषध नेमके काय आहे? तिचा ओव्हर डोसमुळे मृत्यू झाला का आदी तपास पोलीस करत आहेत. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.