Kolhapur Airport Expansion : काहीही करा, पण एप्रिलपर्यंत कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम पूर्ण करा : सतेज पाटील - Kolhapur Night Landing
कोल्हापूर विमानतळाच्या प्रस्तावित टर्मिनल विस्तारीकरणाचे ( Kolhapur Airport Expansion ) काम सध्या सुरु आहे. या कामासाठी कामगारांची कामगारांची संख्या वाढवून दोन शिफ्टमध्ये काम सुरु करा, पण एप्रिलपर्यंत काम पूर्ण झाले पाहिजे, अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील ( Gaurdian Minister Satej Patil ) यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
कोल्हापूर : विमानतळाच्या प्रस्तावित टर्मिनल बिल्डिंगचे ( Kolhapur Airport Terminal Building ) काम एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यासाठी कामगारांची संख्या वाढवा, तसेच दोन शिफ्टमध्ये काम सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील ( Gaurdian Minister Satej Patil ) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिल्या. स्वतः पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण ( Kolhapur Airport Expansion ) कामांबाबत प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी टर्मिनल बिल्डिंग, भूसंपादन, नाईट लँडिंग, कार्गो सेवा, धावपट्टी विस्तारीकरण आदी कामांचा सविस्तर आढावा घेतला.
लवकरच कोल्हापूर-शिर्डी विमानसेवा सूर होणार
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर-मुंबई या मार्गावरील विमानसेवा सुरु करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून याबाबत विमान कंपन्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. तसेच, ही सेवा सकाळच्या सत्रात उपलब्ध करून देण्यावर आमचे विशेष लक्ष आहे. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ( Kolhapur Mumbai Airlines ) सुरु झाल्यानंतर लगेचच कोल्हापूर-शिर्डी विमानसेवा ( Kolhapur Shirdi Airlines ) सुरु करण्यात येणार आहे. सध्या सुरू असेलल्या कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा ( Kolhapur Ahmadabad Airlines ) नियमित करण्याबाबतच्या सूचना इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांना केल्या असेही ते म्हणाले.
लवकरच नाईट लँडिंग सुविधेचे कोल्हापूरकरांचे स्वप्न पूर्ण होणार
ते पुढे म्हणाले, बेळगाव विमानतळाच्या ( Belgaum Airport ) धर्तीवर कोल्हापूर विमानतळाचे आगमन आणि निर्गमनाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. विमानतळाच्या नाईट लँडिंग (Kolhapur Night Landing ) प्रक्रियेतील महत्वाचा असलेला पहिला टप्पा पूर्ण झाला असून नुकताच कोल्हापूर विमानतळाला 'आयएफआर' परवाना मिळाला आहे. एव्हडचे नाही तर कमी दृश्यमानता असतानाही विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ करता येणार आहे. त्यामुळे, कमी दृश्यमानतेमुळे ऐनवेळी विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ रद्द करावे लागणार नाहीत. त्यामुळे, लवकरच नाईट लँडिंग सुविधेचे कोल्हापूरकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे असेही ते म्हणाले.