कोल्हापूर Ganeshotsav 2022 पंचगंगा नदीमध्येच विसर्जन करण्यासह, काही मागण्यांसाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी तुम्हाला आमच्या सणा वेळीच पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय येतो, असे म्हणत आमच्यावर कोणत्याही पद्धतीने सक्ती नको असे हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करा, अनेक वर्षांपासून नदी प्रदूषणाचे प्रमाण जे कमी होत Ganapati Visarjan and Dolby आहे, ते असेच पुढे आपल्या सहकार्याने अजून कमी District Collector gave important information होऊ द्या, असे आवाहन केले. शिवाय कोल्हापूरकर नेहमीच चांगल्या गोष्टींना नक्की प्रतिसाद देतात. त्यामुळे सर्वजण नदीकाठी बनविण्यात येणाऱ्या विसर्जन कुंडातच विसर्जन करतील, असेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार Collector Rahul Rekhawar यांनी म्हणटले.
समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी काय केली मागणीदरम्यान, समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये महत्वाचा विषय होता तो म्हणजे गणेश मूर्ती विसर्जनाचा. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्हीं आमच्या इच्छेनुसार कुठेही विसर्जन करू, आमच्यावर सक्ती नको असे म्हणटले. शिवाय शक्य असल्यास नदीमध्येच कुंड बनविण्यात यावेत, ज्यामुळे नागरिकांना आपण नदीमध्येच विसर्जन केले याचे समाधान मिळेल, असेही ते म्हणाले. मात्र जिल्हाधिकारी यांनी पंचगंगा प्रदूषण होणार नाही, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मोहिमेला प्रतिसाद द्या. यावर्षी सुद्धा नदीच्या पाण्याने भरलेल्या विसर्जन कुंडामध्येच मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन केले. शिवाय कोल्हापूरकर नेहमीच चांगल्या गोष्टीला प्रतिसाद देत आले आहेत आणि यापुढच्या काळात सुद्धा ते असाच प्रतिसाद देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.