महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

child laborers in Kolhapur : कोल्हापूरमधील पॉलीसॅक्स कंपनीमध्ये आढळले परराज्यातील सव्वाशे बालमजूर, जिल्हाप्रशासनासह संयुक्त पथकाची कारवाई - पॉलीसॅक्स कंपनी बालकामगार

कोल्हापूर शहरातील अवनी संस्थेला ( Avni Sanstha Kolhapur ) येथील शिरोली एमआयडीसी येथील एका कंपनीमध्ये अनेक बालमजूर काम करत आहेत अशी माहिती मिळा ( child workers issue in Kolhapur ) ली होती. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावर ( District Collector Rahul Rekhawa ) यांना माहिती दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सहाय्यक आयुक्त, अवनी संस्था, जिल्हा महिला बालविकास विभाग आणि पोलिसांचे संयुक्त पथक बनवले.

परराज्यातील सव्वाशे बालमजू
परराज्यातील सव्वाशे बालमजू

By

Published : May 12, 2022, 10:42 PM IST

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोली एमआयडीसी येथील पॉलीसॅक्स कंपनीमध्ये ( child laborers in polyxax company ) तब्बल सव्वाशे बालमजूर काम करताना सापडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेल्या संयुक्त पथकाने धाड टाकून ही कारवाई केली ( child laborers in Kolhapur ) आहे. हे सर्व कामगार एकाच कंपनी मध्ये काम करत होते असे धाडीत स्पष्ट झाले आहे.

बालकामगार हे पश्चिम बंगाल, मिझोराम तसेच विविध राज्यांमधले असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. अजूनही काही ठिकाणी असे बालमजूर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


अवनी संस्थेला मिळाली होती माहिती; 'या' पथकाने केली कारवाई - कोल्हापूर शहरातील अवनी संस्थेला ( Avni Sanstha Kolhapur ) येथील शिरोली एमआयडीसी येथील एका कंपनीमध्ये अनेक बालमजूर काम करत आहेत अशी माहिती मिळा ( child workers issue in Kolhapur ) ली होती. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावर ( District Collector Rahul Rekhawar ) यांना माहिती दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सहाय्यक आयुक्त, अवनी संस्था, जिल्हा महिला बालविकास विभाग आणि पोलिसांचे संयुक्त पथक बनवले. त्यानुसार आज दुपारी संबंधित कंपनीमध्ये धाड टाकली. त्याठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल सव्वाशे बालमजूर काम करताना आढळले. पथकाने तात्काळ कंपनीवर कारवाई केली. आजपर्यंतची मोठी कारवाई आहे. अजूनही काही ठिकाणी बाल मजूर असतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details