महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dhananjay mahadik on satej patil इथून पुढे महाभारतच होणार, धनंजय महाडिक यांचा सतेज पाटलांना इशारा

मी बोललो होतो आमची सत्ता आल्यानंतर आपल्याला झेपणार नाही. आता इथून पुढे महाभारतच होणार आहे आणि Dhananjay mahadik comment on satej patil वाईटाचा नाश होणार असल्याचे म्हणत खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांना एकप्रकारे इशारा दिला आहे.

By

Published : Aug 20, 2022, 9:50 AM IST

Dhananjay mahadik on satej patil
धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना इशारा

कोल्हापूरमी बोललो होतो आमची सत्ता आल्यानंतर आपल्याला झेपणार नाही. आता इथून पुढे महाभारतच होणार आहे आणि वाईटाचा नाश होणार असल्याचे म्हणत खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांना Dhananjay mahadik comment on satej patil एकप्रकारे इशारा दिला आहे. राज्यभरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली. कोल्हापूरमध्ये सुद्धा तीन वर्षांपासून ज्या महाडिक युवाशक्तीची दहीहंडी Dhananjay mahadik warn satej patil झाली नाही ती पुन्हा झाली. यामध्ये धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला. शिवाय येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आपलाच विजय असणार असल्याचेही महाडिक म्हणाले म्हटले.

बोलताना भाजप खासदार धनंजय महाडिक

हेही वाचाKolhapur Dahihandi 2022 अलमट्टी हटाव, महाराष्ट्र बचाव, पुरग्रस्तांची प्रतिकात्मक धरण फोडून दहीहंडी साजरी

गुन्हे दाखल करून कारखाने, संस्था बंद पडण्याचा प्रयत्न आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता धनंजय महाडिक म्हणाले, आपलं ठरलंय म्हणत आपला घात केला. त्यांनी त्यानंतर आमच्या महाडिक परिवाराला प्रचंड त्रास दिला. आमचे सगळे व्यवसाय, संस्था, कारखाने बंद पाडायचा डाव केला. आमच्यावर 13, 14 गुन्हे दाखल केले, आम्ही काय गुन्हेगार आहे का? असा सवाल करत अति केलेले चालत नाही, असेही ते म्हणाले. पण, मी तेव्हा बोललो होतो आता तुमची सत्ता आहे. सूर्य मावळलेला उगवणारच, आमची सत्ता आल्यानंतर आपल्याला झेपणार नाही. आता तेच होणार असून इथून पुढे महाभारतच होणार असल्याचे धनंजय महाडिक म्हणाले. आम्ही महादेवराव महाडिक यांच्या तालमीत तयार झालो आहोत. शिवाय आता राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आता भाजप आणि शिंदे गटाची सत्ता येईल, असेही महाडिक म्हणाले.

हेही वाचाDahi Handi Festival Kolhapur युवाशक्ती दहीहंडीचा थरार रंगणार, तयारी पूर्ण

ABOUT THE AUTHOR

...view details