कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला असून नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागत आहे, अशी टीका पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
देवेंद्र फडणवीसांमुळे नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ पूररेषा आणि नदीच्या पाणीपातळीतील फरक फडणवीसांना कळाला नाही पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाला नाही. त्यामुळे त्यांनी क्रिडाईने पूर रेषेच्या बाबतीत दिलेला अहवाल स्विकारला. शिवाय निळा आणि लाल रेषेतील बांधकामांना सरसकट सूट दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागत आहे अशाही त्या म्हणाल्या. शिवाय गेल्या दोन-तीन वर्षांपासून महापूराची तीव्रता वाढली आहे. या सर्वाला पूररेषेच्या बाबतीत बेजबाबदारपणे निर्णय घेणारे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यामुळे किमान आतातरी पूर रेषेची नव्याने आखणी केली पाहिजे अशी मागणी सुद्धा मेधा पाटकर यांनी केली.
मोदींचे देशात काय परिस्थितीकडे दुर्लक्ष
मेधा पाटकर पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर जाऊन पर्यावरणासंदर्भात मोठमोठी वक्तव्य करत आहेत. मात्र त्याच वेळी देशात काय परिस्थिती सुरू आहेत याकडे मात्र दुर्लक्ष आहे अशी देखील टीका पाटकर यांनी केली.
हेही वाचा -क्रुझ ड्रग्ज प्रकरणाची आजपासून NCB एसआयटीच्या 'स्पेशल 20'कडून चौकशी, आर्यनच्या अडचणी वाढणार?