महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : 'डेस्टीनेशन प्री-वेडिंग फोटोशूट' आणि फोटोग्राफीचे वाढलेले महत्व

गेल्या काही वर्षांपासून प्री-वेडिंग फोटोशूटचा ( Pre Wedding Photoshoot )एक ट्रेंडच बनला आहे. त्यासाठी मग 50 हजारांपासून अगदी अमर्याद खर्च करणारे सुद्धा काहीजण आहेत.  पाहुयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा यासंदर्भातील सविस्तर रिपोर्ट...

By

Published : Nov 29, 2021, 7:01 AM IST

Updated : Nov 29, 2021, 9:36 AM IST

pre-wedding-photoshoot
डेस्टीनेशन प्री-वेडिंग फोटोशूट

कोल्हापूर - सद्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटची ( Pre Wedding Photoshoot )चांगलीच क्रेझ वाढली आहे. एकीकडे घरातल्या मंडळींची लग्नाच्या हॉलपासून अगदी दागदागिने, कपडे खरेदीच्या नियोजनासाठी धांदल उडालेली असते. दुसरीकडे मात्र वधू-वर आपण प्री-वेडिंग शूट कुठे करायचे याचा बेत आखताना दिसत असतात. गेल्या काही वर्षांपासून प्री-वेडिंग फोटोशूटचा एक ट्रेंडच बनला आहे. त्यासाठी मग 50 हजारांपासून अगदी अमर्याद खर्च करणारे सुद्धा काहीजण आहेत. पाहुयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा यासंदर्भातील सविस्तर रिपोर्ट...

ईटीव्ही भारत विशेष : 'डेस्टीनेशन प्री-वेडिंग फोटोशूट' आणि फोटोग्राफीचे वाढलेले महत्व




फोटोशूट आणि त्याचे महत्व -

कॅमेरा आणि फोटो आजच्या युगात आपल्या जीवनातील एक अविभाज्य भागच जणू बनले आहेत. प्रत्येक क्षणाला आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेरातून फोटो काढत असतो आणि ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत असतो. त्यामुळे फोटोचे आपल्या जीवनातील महत्व अधोरेखित होते. शिवाय आपल्या जीवनात असे काही क्षण असतात जे आपल्याला सदैव जपून ठेवावे, असे वाटतात. त्यापैकीच एक म्हणजे लग्न. यावेळी मात्र सर्वात चांगले फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरच्या शोधात अनेकजण पाहायला मिळतात. मग प्री-वेडिंग फोटोशूट पासून साखरपुडा आणि लग्नाच्या संपूर्ण शूटचे बुकींग केले जाते. गेल्या 5 ते 6 वर्षांच्या तुलनेत सध्या लग्नाच्या फोटोशूट बरोबरच प्री-वेडिंग फोटोशूटचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आता तर प्रत्येकजण हमखास प्री-वेडिंगसाठी ( Pre Wedding ) विविध ठिकाणी जात असल्याचे पाहायला मिळतात.



फोटोग्राफी आणि कोट्यवधींची उलाढाल -

जेवढा खर्च संपूर्ण लग्नाला होतो. अगदी तेव्हढाच खर्च केवळ फोटोशूटसाठी करणारे सुद्धा अनेक आहेत. मग 50 हजारांपासून ते अमर्याद खर्च करणारी हौशी लोकांची सुद्धा कमी नाही. दरवर्षी या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असते. वधू-वर सुद्धा आपले प्री-वेडिंग शूट सर्वांपेक्षा अधिक चांगले कसे होईल, यासाठी प्रयत्न करत असतात. मग कोल्हापूर जिल्ह्यासह देशातील विविध निसर्गरम्य ठिकाणी फोटोशूट केले जाते. यामध्ये हजारोपासून लाखों रुपयांचा खर्च केला जातो.



'प्री-वेडिंग शूट'ची ठिकाणे कसे निवडतात ?

वधू वर आपल्या प्री-वेडिंग शूट च्या बुकिंगसाठी फोटोग्राफर ( Photographer ) यांच्याकडे येत असतात तेंव्हा सर्वात पहिला त्यांना शूट वर किती खर्च अपेक्षित आहे याची विचारणा केली जाते. त्यामध्ये मर्यादा असतील तर जवळच्याच काही ठिकाणांवर जाऊन अधिकाधिक चांगले शूट केले जाते. मात्र असे काहीजण असतात जे शूट वर खर्च करायला अजिबात कचरत नाहीत. त्यासाठी मग केरळपासून जम्मू काश्मीर, लडाखपर्यंत असे देशातील प्रत्येक निसर्गरम्य ठिकाणी जाऊन शूट करणारे सुद्धा आहेत. दरम्यान, अनेकजण काही ठराविक ठिकाणीच शूट करत असल्याचेही पाहायला मिळते. मात्र, त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी शूट असायला हवे असे फोटोग्राफर ना सुद्धा वाटत असते. त्यामुळे ते स्वतः देशातील अशा काही अपरिचित ठिकाणांच्या शोधात असतात. त्यासाठी काही ट्रॅव्हल ब्लॉगरची सुद्धा ते मदत घेत असतात असे कोल्हापूरातील प्रोफेशनल फोटोग्राफर मिनार देवलापूरकर यांनी म्हंटले आहे.



कोल्हापूरसह देशभरातील डेस्टिनेशन प्री-वेडिंग फोटोशूटची ठिकाणं -

कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. यामध्ये गगनबावडा, आंबा, राधानगरी, पन्हाळा परिसर, मसाई पठार, चित्रनगरी, रंकाळा शिवाय अनेक अपरिचित ठिकाणे सुद्धा आहेत जिथे फोटोशूट साठी नेहमी फोटोग्राफर प्राधान्य देत असतात. मात्र देशभरातील विविध ठिकाणी जाऊन सुद्धा फोटोशूट वर खर्च करणारे आहेत. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य केरळ, गोवा, राजस्थान, जम्मू - काश्मीर, लडाख आदी ठिकाणांचा समावेश आहे. काही ठिकाणी मोफत शूटिंग साठी परवानगी असते तर काही ठिकाणी फोटोग्राफरना पैसे देऊन त्याठिकाणी शूट करावे लागते असेही मिनार देवलापूरकर यांनी म्हंटले.



ट्रेंड बदलत जातात -

सध्या प्री-वेडिंग फोटोग्राफीचा जरी मोठ्या प्रमाणात ट्रेंड सुरू असला तरी हाच ट्रेंड बदलायला सुद्धा वेळ लागणार नाही, असे देवलापूरकर यांनी म्हंटले आहे. दररोज ग्राहकांच्या ज्या अपेक्षा असतात त्यानुसार हा ट्रेंड बदलत चालला आहे.

Last Updated : Nov 29, 2021, 9:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details