कोल्हापूर- गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत गेल्या चोवीस तासांत तब्बल 20 फुटांची वाढ झाली आहे. राजाराम बांधावरील पाण्याची पातळी 33 फुटांवर असून सध्या पाण्याच्या पातळीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. इशारा पातळी 39 फुटांवर असून धोका पातळी 43 फुटांवर आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील भडगाव नजीक पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पातळीची वाटचाल इशारा पातळीकडे, जिल्ह्यातील ५९ बंधारे पाण्याखाली - कोल्हापूर पाऊस
पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत गेल्या चोवीस तासांत तब्बल 20 फुटांची वाढ झाली आहे. राजाराम बांधावरील पाण्याची पातळी 33 फुटांवर असून सध्या पाण्याच्या पातळीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. इशारा पातळी 39 फुटांवर असून धोका पातळी 43 फुटांवर आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील भडगाव नजीक पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पंचगंगाच्या राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी सकाळी आठ वाजता 33 फुटांवर होती. तर जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून ११०० क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूरकरांना दिलासा देणारी बाब म्हणजे जिल्हा प्रशासनाने सातर्क राहत कर्नाटकच्या हिप्परगी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हिप्परगी धरणातून 72 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत घट होऊ शकते, मात्र राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, करवीर तालुक्यातील पावसाचा जोर कायम आहे. तर धरण क्षेत्रात देखील पावसाची मुसळधार सुरूच आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. दरम्यान असाच पाऊस राहिला तर येत्या काही वेळात पंचगंगा नदी इशारा पातळी गाठू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 182 मीमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, तर हातकणंगले 89 मिमी, शिरोळ 73 मिमी पन्हाळा 115 मिमी, शाहूवाडी 127 मिमी, राधानगरी 120 मिमी, गगनबावडा 182मिमी, करवीर 97 मिमी, कागल 110 मिमी, गडहिंग्लज 107 मिमी भुदरगड 97 मिमी, आजरा 85 तर चंदगड तालुक्यात 113 मिमी पावसाची नोंद झाली आहे.