कोल्हापूर- जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाचे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून आणखी दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 22 वर पोहोचली आहे. यामध्ये इचलकरंजी शहरात सर्वाधिक 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 18 रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाला घरी सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 82 रुग्णांपैकी 797 जणांना रुग्णालयातून घरी सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 263 इतकी झाली आहे. मृत्यू झालेल्या दोन रुग्णांमध्ये करवीर तालुक्यातील वळीवडे गावातील 40 वर्षांचा व्यक्ती तर जिल्ह्याबाहेरील 75 वर्षांच्या वृद्धाचा समावेश आहे.