महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना 'डेथ ऑडिट' करण्याचे काम सुरू; मृत्यूदर कमी करण्यासाठी लवकरच मार्ग काढू - यड्रावकर - कोरोना मृत्यूदर

राज्य आणि देशापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर जास्त आहे. हा मृत्यूदर वाढवण्यामागे काही वेगळी कारणे नाहीत मात्र तरीही झालेल्या मृत्यूचे 'डेथ ऑडिट' करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे निश्चितच आपण मृत्यूदर कसा कमी करता येईल, याबाबत मार्ग काढू असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

Corona  'Death Audit
Corona 'Death Audit

By

Published : Apr 20, 2021, 4:03 PM IST

कोल्हापूर - राज्य आणि देशापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर जास्त आहे. हा मृत्यूदर वाढवण्यामागे काही वेगळी कारणे नाहीत मात्र तरीही झालेल्या मृत्यूचे 'डेथ ऑडिट' करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे निश्चितच आपण मृत्यूदर कसा कमी करता येईल, याबाबत मार्ग काढू असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कोल्हापुरात म्हटले.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
पश्चिम महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण वाढले -
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने 60 हजारांच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. मृत्यूचे प्रमाण सुद्धा काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये. दररोज 300 ते 500 रुग्णांचा मृत्यू होत आहे. यामध्ये आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबतच आज आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना विचारणा केली असता हा मृत्यूदर वाढवण्यामागे काही वेगळी कारणं नाहीत मात्र तरीही झालेल्या मृत्युचे 'डेथ ऑडिट' करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे निश्चितच आपण यावर मार्ग काढू असे त्यांनी म्हटले. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा काल तब्बल 34 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. आजपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे कोल्हापुरात नोंद नव्हती. त्यामुळे मृत्यूदर वाढण्यामागे नेमकी काय कारणे आहेत हे सुद्धा पाहिले जाणे आता महत्वाचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details