पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ; 2019 च्या महापुराची पुनरावृत्ती होण्याची भीती - Continuous rain in Kolhapur district
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सद्या नदीची पाणी पातळी 50 फुटांपर्यंत पोहोचली असून जिल्ह्यातले 116 बंधारे पाण्याखाली गेले असून 2019 च्या महापुराची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातत्याने पाणी पातळीत वाढ सुरू आहे. सद्या नदीची पाणी पातळी 50 फुटांपर्यंत पोहोचली असून जिल्ह्यातले 116 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक मार्ग बंद झाले असून काही पर्यायी मार्ग सुरू आहेत. जिल्ह्यातल्या सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने हळू हळू परिस्थिती आणखीनच बिकट बनत चालली आहे. सद्या पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडून वाहत आहे. शिवाय प्रत्येक तासाला पाणीपातळीत वाढ सुरू आहे. त्यामुळे यंदाचा महापुर सुद्धा 2019 च्या महापुराची आठवण करून देत असून त्या सारखीच परिस्थिती बनते की काय अशी भीती सर्वांना लागून राहीली आहे. दरम्यान, याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी....