कोल्हापूर - आमचं ठरलय म्हणत संजय मंडलिक ( Sanjay Mandalik ) यांना निवडून आणले मात्र तेच आता शिंदे गटात सामील झाल्याने त्याचं शल्य वाटत असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते सतेज पाटील ( MLA Satej Patil ) यांनी मंडलिक यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. संजय मंडलिक यांनी शिवसेना ( Siv Sena ) सोडण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा होता असेही त्यांनी म्हंटल आहे. जिल्हाने एका प्रवृत्ती विरोधात लढत तुम्हाला निवडून दिले. मात्र, आता तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का? असा सवालही त्यानी मंडलिक विचारला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.सोबतच जिल्ह्यातील राजकारणात मी तुमच्या सोबतच असणार असल्याचे मंडलिक यांनी सतेज पाटील यांना सांगून गेल्याचे यावेळी पाटील म्हणाले आहेत.
संजय मंडलिक यांनी घेतलेल्या निर्णयावर नाराजी -खासदार संजय मंडलिक (MP Sanjay Mandalik ) हे एकनाथ शिंदेच्या गटात ( Joined Eknath Shinde Group ) सामील झाल्याने याचे पडसाद जिल्ह्यातील राजकारणावर उमटत आहेत. याच सर्व विषयावर माजी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला..यावेळी पाटील यांनी संजय मंडलिक यांनी घेतलेल्या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. मात्र, खासदार मंडलिक यांनी शिंदे गटात जाण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली. त्यांना मी सर्व राजकीय परिस्थितीची माहिती दिली होती. तरीही ते शिंदे गटात गेले पण, जाताना त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात तुमच्यासोबत राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे असल्याचे पाटील म्हणाले. तसेच गोकुळ, जिल्हा बँक यामध्ये आम्ही विशिष्ट प्रवृत्तीविरोधात एकत्र लढलो त्यामुळे तेथील सत्तेमध्ये काहीही बदल होणार नाही. आम्ही एकत्र राहून काम करू असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.