कोल्हापूर -आज रविवारी सर्वत्र महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा (TET Exam) होत आहे. मात्र, अनेक परीक्षा केंद्रावर गोंधळ पाहायला मिळत आहे. उशिरा आल्याचे कारण देत अनेक परीक्षा केंद्राचे गेट बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. एसटी संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे, तर काही ठिकाणी परीक्षा केंद्राची चुकीचा पत्ता टाकण्यात आल्याची देखील काही उदाहरणे समोर आली आहेत.
उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना काढले बाहेर -
दरम्यान, उशिरा आल्याचे सांगत अनेक परीक्षार्थी गेटवर आत घेण्याची विनंती करताना पाहायला मिळाले. मात्र, आत मध्ये जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यांना या गोंधळाचा कोणत्याही पद्धतीने त्रास होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. त्यामुळे अनेक विद्यार्थी आता केंद्राबाहेरच उभे राहिले आहेत.