कोल्हापूर - कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला तोंड देत अखेर महाविद्यालयचा परिसर पुन्हा एकदा गजबजू लागला आहे. गुरुवारपासून कोल्हापुरातील अकरावीचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या महाविद्यालयात सर्व नियमांचे पालन करून पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत आहे.
कोल्हापूर - अकरावीचे वर्ग फुलले, कोरोनानंतर तब्बल आठ महिन्यांनी परिसर गजबजला - colleges starts in kolhapur
कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला तोंड देत अखेर महाविद्यालयचा परिसर पुन्हा एकदा गजबजू लागला आहे. गुरुवारपासून कोल्हापुरातील अकरावीचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या महाविद्यालयात सर्व नियमांचे पालन करून पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत आहे.
एक दिवसाआड 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती महाविद्यालयात असणार आहे. महाविद्यालयांकडून शासनाच्या नियमानुसारच सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा त्याशिवाय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. शालेय जीवनातून मुक्त होऊन विद्यार्थ्यांनी महाविद्यालय विश्वाला सुरुवात केली असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर देखील आनंद दिसून येत होता. तर महाविद्यालयाचा परिसर आठ महिन्यानंतर गजबजून गेला आहे.
महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी
कोरोना काळात विद्यार्थ्यांची काळजी महाविद्यालयाकडून घेतली जात आहे. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटायझर बंधनकारक केले असून तोंडावर मास्क आणि सामाजिक अंतराचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच एका बेंचवर एकाच विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. वर्ग संपल्यानंतर पुन्हा त्या वर्गाचे डायजेशन महाविद्यालयाकडून केले जात आहे.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाचा फायदा
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्या जाणवत होत्या. विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमजोर होत असल्याचे समोर आले होते. मात्र शासनाच्या नियमानुसार प्रत्यक्षात वर्गात उपस्थित राहून तास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. असे अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले.