महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवरात्रोत्सवानंतरही आता अंबाबाई आणि जोतिबाचे ई-पास काढूनच मिळणार दर्शन - अंबाबाई मंदिर

नवरात्रोत्सवानंतरही आता अंबाबाई मंदिर आणि श्री जोतिबाचे दर्शन ऑनलाईन ई-पास काढूनच घेता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत माहिती दिली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवात अतिशय नियोजनरीत्या भाविकांना अंबाबाई आणि जोतिबाचे दर्शन घेता आले त्यामुळे यापुढेही अशाच पद्धतीने भाविकांनी दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Oct 16, 2021, 3:01 PM IST

कोल्हापूर- नवरात्रोत्सवानंतरही आता अंबाबाई मंदिर आणि श्री जोतिबाचे ऑनलाईन ई-पास काढूनच दर्शन घेता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत माहिती दिली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवात अतिशय नियोजनरीत्या भाविकांना अंबाबाई आणि जोतिबाचे दर्शन घेता आले त्यामुळे यापुढेही अशाच पद्धतीने भाविकांनी दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सव काळात सुरळीत दर्शन

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. ऐन नवरात्रोत्सवात मंदिरे उघडल्याने भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊनच कोल्हापुरातील अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी मोफत ई-पासची सोय करण्यात आली. या पार्श्वभूमीवर तासाला जवळपास 1 हजार 500 भाविकांना ई-पासद्वारे दर्शन देण्यात आले. त्यामुळे संपूर्ण नवरात्रोत्सव काळात भाविकांना सुरळीत दर्शन घेता आले. ई-पासमुळे केवळ मोजक्याच लोकांना प्रत्येक तासाला दर्शन घेता येऊ शकत होते. त्यामुळे अनेकांना दर्शन घेता आले नसल्याने नाराजीही व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details