कोल्हापूर : 'आझादी का अमृत महोत्सव' ( Nectar Jubilee Year of Independence ) अंतर्गत 'हर घर तिरंगा' उपक्रम 11 ते 17 ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय, निम शासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारती व प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा लावायचा असून, या उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार ( Collector Rahul Rekhawar ) यांनी केल्या. ( The nectar festival of independence )
जनजागृती करण्याचे आदेश : 'हर घर तिरंगा' व अन्य उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत सर्व संस्था, कार्यालयांच्या इमारतींवर तसेच प्रत्येक नागरिक आपापल्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जनजागृती करा.
उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन : स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करूया, असे आवाहन त्यांनी केले.