कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची यावर्षीची सभा सुद्धा नेहमीप्रमाणे गोंधळात पार पडली. विरोधकांनी बोलायला दिले नाही, माईक बंद ठेवला तसेच बसायला सुद्धा जागा दिली नाही असे म्हणत एकच गोंधळ घातला. शिवाय या सभेतून विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक तसेच इतर सभासद बाहेर पडले. यावेळी नेहमीप्रमाणेच सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा सभेत गोंधळ झाला. मात्र सभा जवळपास सव्वा तास चालली.
Gokul Meeting Rada कोल्हापुरात गोकुळच्या सभेआधी राडा, विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी
कोल्हापुरात गोकुळची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेआधीच विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगली जुंपल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याची केल्याची माहिती आहे.
महाडीकांचे टँकर बंद पडले म्हणूनच गोंधळ -दरम्यान, माजी आमदार महादेवराव महाडिक जे सध्या विरोधी गटाचे नेते आहेत त्यांच्या एकट्याचे 40 टँकर होते. घरातील 32 टक्के टँकर गोकुळमध्ये त्यांनी लावले होते. सत्ता बदल झाल्याने हे टँकर बंद झाले त्यामुळेच विरोधकांनी नाहक आरोप चालू केले आहेत आणि त्यामुळेच हा गोंधळ घातला असल्याची प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -Dussehra gathering शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आमचाच होणार, उद्धव ठाकरेंची घोषणा