कोल्हापूर - जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा अभिनव असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तीनही मंत्र्यांनी मिळून हा उपक्रम राबिवन्यास सुरुवात केलीय आहे. आज सुद्धा लोकशाही दिनानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांचे अर्ज स्वीकारत त्यांचे प्रश्न सोडविण्याचे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्ह्यातील नागरिकांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी भेटून त्यांची निवेदने, प्रलंबित प्रश्न जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
दुसऱ्या 'जनता दरबार'ला ही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ; 1 हजार अर्ज प्राप्त
जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोल्हापूरात जनता दरबारचे आयोजन करण्यात येते. या जनता दरबारमध्ये जवळपास १ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
दुसऱ्या 'जनता दरबार'ला सुद्धा नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ; जवळपास 1 हजार अर्ज प्राप्त
गेल्या महिन्यात आलेल्या अर्जापैकी बहुतांश प्रश्न सोडविण्यात यश आले असून आजच्या दुसऱ्या लोकशाही दिनानिमित्त सुद्धा जवळपास 1 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे जे अधिकारी लोकांचे प्रश्न सोडविण्यात किंव्हा त्यांच्या कर्तव्यात कसूर करताना दिसत आहेत, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात येत असल्याची सतेज पाटील यांनी माहिती दिली. या संदर्भातच उपक्रमाची अधिक माहिती घेतली आहे,आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.