कोल्हापूर - राज्यभरात कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार उडवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कडक असे निर्बंधसुद्धा घालण्यात आले असून दररोज सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत शासनाने जमावबंदीचे आदेश दिले आहेत. असे असताना कोल्हापूरात त्याचे उल्लंघन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. येथील पंचगंगा नदीमध्ये तर शेकडोंच्या संख्येने दररोज नागरिक पोहायला येत असल्याचे पाहायला मिळत आहे. गंभीर बाब म्हणजे यामध्ये लहान मुलेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर फुलेवाडी परिसरातील एका मैदानावरही अनेक मुले दररोज खेळताना दिसत असून एकाही मुलाच्या तोंडावर मास्क पाहायला मिळत नाही.
पंचगंगा नदीसह मैदानांवर गर्दी करत नागरिक करताहेत नियमभंग - kolhapur corona update
कडक असे निर्बंधसुद्धा घालण्यात आले असून दररोज सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत शासनाने जमावबंदीचे आदेश दिले आहेत. असे असताना कोल्हापूरात त्याचे उल्लंघन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
रस्त्यांवरही सकाळी-सायंकाळी गर्दी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'ब्रेक द चेन'च्या अंतर्गत सकाळी 7 ते रात्री आठपर्यंत राज्यभरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या आदेशाचे सर्वत्रच उल्लंघन होताना पाहायला मिळत आहे. शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र कोल्हापुरातील अनेक मुख्य बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये दुकान उघडण्याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे अनेकांनी दुकान सुरू ठेवले आहे तर काहींनी कारवाईच्या भीतीने दुकान बंद ठेवले आहेत. त्यामुळे रस्त्यावरही नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. सकाळी आणि सायंकाळी ही गर्दी जास्तच होत आहे.