महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारकासाठी 'शाहू स्पर्श' मृदेचे संकलन - memorial

कोल्हापूर महापालिकेतर्फे स्वनिधीतून राजर्षी शाहू महाराज यांची समाधी नर्सरी बागेत बांधली जात आहे.

'शाहू स्पर्श'

By

Published : Feb 13, 2019, 5:15 PM IST

कोल्हापूर- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नर्सरीबाग येथे स्मारक उभारले जात आहे. या स्मारकासाठी जिल्ह्यातील विविध भागातून मृदा संकलन केली जात आहे. ज्या ठिकाणी शाहू महाराजांचा पदस्पर्श झाला आहे,

'शाहू स्पर्श'
अशा सर्व जागेवरची माती संकलन करण्यात आली आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर हा कार्यक्रम झाला.'शाहू स्पर्श' मृदा संकलनाची जबाबदारी समितीचे सदस्य वसंतराव मुळीक व इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या सदस्यांनी आतापर्यंत कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ, मुंबई येथील पन्हाळा लॉज, जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, माणगाव परिषद, अंबाबाई मंदिर परिसर, राधानगरी तलाव आदी ठिकाणची मृदा संकलित केली आहे. कार्यक्रमात महापौर सरिता मोरे यांच्याकडे ही संकलीत मृदा सोपविण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details