महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Leena Nair Kolhapur Connection : मी हृदयापासून कोल्हापुरी - लीना नायर - 26/11 दहशतवादी हल्ला ताज हॉटेल

फ्रान्समधील लक्झरी ग्रुप 'शनैल'ने (Chanel French luxury fashion house) जागतिक सीईओ झालेल्या लीना नायर (Leena Nair CEO Chanel From Kolhapur) या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. नुकत्याच त्या कोल्हापूरातील शांतिनिकेतन (Shantiniketan, Kolhapur) या शाळेत एका कार्यक्रमासाठी असताना विद्यार्थांना मार्गदर्शन केले...

Leena Nair
Leena Nair

By

Published : Dec 16, 2021, 7:36 AM IST

कोल्हापूर :कोल्हापूरात जन्मलेल्या आणि इथेच आपल्या 12 पर्यंतचे शिक्षण घेतल्या लीना नायर (Leena Nair CEO Chanel From Kolhapur) यांना नुकतीच फ्रान्समधील लक्झरी ग्रुप 'शनैल'ने जागतिक सीईओ पदाची (Leena Nair is the CEO of French fashion brand Chanel) जबाबदारी दिली आहे. जागतिक स्तरावर एवढे मोठे नाव केल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. येणाऱ्या नवीन वर्षात त्या या जागतिक सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. दरम्यान, नुकत्याच त्या कोल्हापूरातील शांतिनिकेतन (Shantiniketan, Kolhapur) या शाळेत एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या प्रवासाबाबत सुद्धा माहिती दिली होती. पाहुयात नेमकं काय म्हणाल्या होत्या लीना नायर...

मी हृदयापासून कोल्हापुरी

न्यू कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावीचे शिक्षण
लीना नायर यांचा कोल्हापूरातच जन्म झाला आणि वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत त्या इथेच वाढल्या. त्यांचे शालेय शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल (Holy Cross Convent School) मध्ये झाले. तर त्यानंतर त्यांनी अकरावी आणि बारावीचे शिक्षण न्यू कॉलेज मध्ये घेतले. त्यानंतर त्यांनी सांगलीतील वालचंद कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी जमशेदपूर येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर युनिलिवर मध्ये नोकरीला लागल्या. आज त्यांना फ्रांसमधल्या लक्झरी ग्रुप 'शनैल'ने जागतिक सीईओ पदाची जबाबदारी दिली आहे.

26/11 ला झालेल्या हल्ल्यावेळी होत्या ताज हॉटेल मध्ये
दरम्यान, लीना नायर जेंव्हा शांतिनिकेतन येथे आल्या होत्या. तेंव्हा त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने स्वतःहून जबाबदारी घेणे शिकले पाहिजे म्हटले होते. शिवाय कोणत्याही गोष्टींची तक्रार न करता आपण ती गोष्ट कशी सुधारू शकतो यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही म्हंटले होते. याबाबतच उदाहरण देताना त्यांनी 2008 साली मुंबई मध्ये 26 नोव्हेंबर (26/11 Terror Attack) रोजी झालेल्या दहशतवादी हल्लयात आपण ताज हॉटेल मध्येच होतो असेही त्यांनी म्हंटले. यावेळी आपल्या पतीसह युनिलीवर कंपनीतील दहा प्रतिनिधींसोबत अडकले होते. मात्र, ताज हॉटेलमधल्या स्टाफ मधील एका 24 वर्षीय मुलीने आम्हाला त्या ठिकाणहून सुखरूप बाहेर काढण्यात मदत केली होती असेही त्यांनी म्हंटले. दहशतवादी आल्यावर त्यांचा कसा सामना करायचा हे शिकवले नसतानाही त्या मुलीने आम्हाला तिथून सुखरूप बाहेर काढले. कारण तिने जबाबदारी न झटकता त्यावर मात कशी करू शकतो हे दाखवले होते असेही लीना यांनी म्हंटले. दरम्यान, मूळच्या कोल्हापूरच्या असल्याने आज त्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. आज प्रत्येक कोल्हापूरकर अभिमानाने त्यांच्याबाबत सांगताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -Leena Nair Kolhapur : लीना नायर यांचा कोल्हापूर ते 'शनैल'च्या सीईओपर्यंतचा प्रवास..

ABOUT THE AUTHOR

...view details