कोल्हापूर - होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका (Legislative Council Election 2021) बिनविरोध करण्याबाबत हालचाली सुरू आहेत अशी चर्चा आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील भाजप पक्षाचा प्रमुख म्हणून माझ्यापर्यंत अशा चर्चा पोहोचतात. मात्र, अद्याप असा कोणताही प्रस्ताव आला नाही. जर आला तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हंटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
- भाजप कोणताही प्रस्ताव देणार नाही, आमची तयारी पूर्ण :
भाजपने ही निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे प्रस्ताव देणार नाही. धुळ्यातील जागेसाठी आम्ही वन वे आहोत. कोल्हापूरमध्येसुद्धा आम्हाला 165 जणांचा सद्यस्थितीत पाठिंबा आहे. जिंकण्यासाठी 43 मतांची गरज आहे त्याची संपूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे. नागपूरमध्येसुद्धा हीच परिस्थिती असून आम्ही 90 मातांनी पुढे आहोत. मुंबईमध्येसुद्धा काही अडचण नसून केवळ अकोलामध्ये चुरशीची लढत होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पण प्रस्ताव आला तर विचार करू, शिवाय 26 तारीख अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जे काही होईल ते लवकर करावे लागेल, असेही पाटील यांनी म्हंटले.
- उगाचच वेळ आणि पैसा घालवणे हा कोणाचा स्वभाव नाही :