कोल्हापूर - आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची कुंडली पाहिली आहे. काय भाग्यवान माणूस जन्माला आला आहे, त्यांना कशाचेच सोयरसुतक नाही, काही काम नाही, पण त्यांना सत्तेतून कुणीही हलवू शकत नाही हे त्यांचे भाग्य आहे, अशी कुंडलीच चंद्रकांत पाटील यांनी वाचून दाखवली. तसेच प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून लोक अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे जातात, असे पाटील यावेळी म्हणाले.
Chandrakant Patil Criticized CM : भाग्यवान माणूस जन्माला आला; चंद्रकांत पाटलांनी वाचली मुख्यमंत्री ठाकरेंची कुंडली - चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे टीका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची कुंडली पाहिली आहे. काय भाग्यवान माणूस जन्माला आला आहे, त्यांना कशाचेच सोयरसुतक नाही, काही काम नाही, पण त्यांना सत्तेतून कुणीही हलवू शकत नाही हे त्यांचे भाग्य आहे, अशी कुंडलीच चंद्रकांत पाटील यांनी वाचून दाखवली.
अजित पवार सडेतोड बोलणारे नेते : चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले आहे. अजित पवार हे सडेतोड बोलणारे आहेत, म्हणून सर्व आमदार मातोश्रीवर न जाता अजित पवार यांच्याकडे जातात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला आहे. प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून लोक अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात, असे ते यावेळी म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.
कोल्हापूर उत्तर निवडणूक रंगतदार : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्याने महविकास आघाडी आणि भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. तसेच एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. चंद्रकांत पाटलांनी अधिवेशन सुरू असताना अजित पवार यांना चिठ्ठी लिहून 'वाटले तर श्रेय तुम्ही घ्या पण एसटीचा संप मिटवा', असे सांगितले होते.