महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही कुठे होता? चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्यालाच शिमगा करून टाकला. राज्यातील विविध प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावर न बोलता दसऱ्या दिवशी शिमगा आहे असं समजून त्यांनी हे भाषण केलं. केंद्राच्या नावाने शिमगा केला, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील

By

Published : Oct 16, 2021, 1:58 AM IST

Updated : Oct 16, 2021, 5:33 AM IST

कोल्हापूर - शिवसेनेला अचानक राम मंदिर आणि हिंदुत्व आठवत आहे. हे काहीतरी वेगळेच संकेत देत आहेत, असं सूचक वक्तव्य करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या दसरा महोत्सवातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठे होता? असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, असे विचारत असताना मुख्यमंत्र्यांना इतिहास माहिती असावा लागतो, अशा शब्दात पाटील यांनी टोला लगावत, स्वातंत्र्य काळात तुम्ही कुठे होता? असा सवालही पाटील यांनी केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरे यांनी दसऱ्यालाच शिमगा करून टाकला -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्यालाच शिमगा करून टाकला. राज्यातील विविध प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावर न बोलता दसऱ्या दिवशी शिमगा आहे असं समजून त्यांनी हे भाषण केलं. केंद्राच्या नावाने शिमगा केला, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शेतकऱ्यांसाठी एक शब्दही मुख्यमंत्र्यांनी काढला नाही -

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलतील अशी अपेक्षा होती. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर ते काहीच बोलले नाहीत. मात्र त्यांनी दसऱ्यालाच शिमगा करून टाकला. एकीकडे शेतकरी आक्रोश करत आहेत. त्यावर एक शब्दही बोलले नाहीत. मात्र, केंद्राच्या नावाने शिमगा केला, असा टोला पाटील यांनी लगावला.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटीचे पॅकेज दिल्याची घोषणा केली. मात्र, या दहा हजार कोटीमध्ये काय काय दिलं? हे स्पष्ट केले नाही. रस्ते आणि धरण दुरुस्त यासाठी पॅकेज दिले. मात्र, शेतकऱ्यांना काय दिले? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटीची फोड केली पाहिजे. त्या पॅकेजमध्ये काय काय आहे? हे देखील स्पष्ट करावे. असे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना इतिहास माहिती आहे का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्वाच्या बाबतीत आणि मोहन भागवत यांच्या भाषणाबद्दल बोलले. याबाबत आश्चर्य वाटत आहे. स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठे होता? असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र असे विचारत असताना मुख्यमंत्र्यांना इतिहास माहिती असावा लागतो, अशा शब्दात पाटील यांनी टोला लगावत, स्वातंत्र्य काळात तुम्ही कुठे होता? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. तत्कालीन वेळी संघ स्थगित ठेवून सगळे स्वयंसेवक स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहासच माहिती नाही. आजच्या भाषणात कशाचाच मेळ लागत नव्हता, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या भाषणात केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतचा पोटशूळ - प्रवीण दरेकर

सत्तेसाठी लाचार होऊन त्यांना हिंदुत्व सोडावं लागलं -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात हिंदुत्व आहे. पण सत्तेसाठी लाचार होऊन त्यांना हिंदुत्व सोडावं लागलं. बाबरी मशीद पाडत असताना एक तरी शिवसैनिक बाबरी पाडण्यासाठी होता का? हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की कोण जबाबदारी घेत नसेल तर मी घेतो. मग बाबरी मशीद शिवसेनेने पाडली असा त्याचा अर्थ घ्यायचा का? असा सवाल देखील पाटील यांनी केला.

केंद्र सरकार आणि मोदी सरकारवर टीका करत असताना राज्य सरकारने काहीही केलं नाही. मात्र केंद्र सरकारने राज्य सरकारला भरभरून दिले आहे. हे त्यांना आठवत नाही का? कोरोना काळात सर्वात जास्त मदत केंद्र सरकारने महाराष्ट्राला केली आहे, असे पाटील म्हणाले.

भाजपला सत्तेत येण्याची घाई नाही -

भाजपला सत्तेत येण्याची घाई नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे काम करत आहोत. पण संघाचे हिंदुत्व कधीही बदललं नाही. संघ असता तर देशात हिंदूची काय अवस्था झाली असती? हे संपूर्ण देशाला माहिती आहे, असे पाटील म्हणाले.

रूपाली चाकणकर यांनी आपल्या औकातीत रहावं -

सांगली येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे एकेरी नाव घेतल्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीने आगपाखड केली आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपण कोणाचे भाषणात नाव घेतले नाही. मात्र, मी टाकलेली टोपी कोणालातरी बसली त्याला मी काय करू?. तसेच राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या औकातीत रहावं, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

हेही वाचा -नवहिंदूंपासूनच हिंदूत्वाला धोका; मुख्यमंत्र्यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघासह केंद्रावर सोडले टिकास्त्र

Last Updated : Oct 16, 2021, 5:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details