कोल्हापूर -राज्य सरकारने वाईन विक्रीस परवानगी दिल्यानंतर विरोधी पक्षाकडून सडकून टीका केली जात ( Opposition Critisized Mahavikas Aghadi Government ) आहे. त्याला प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वाईन विक्री च्या निर्णयाला विरोध करणारे शेतकरी विरोधी आहेत, असे म्हटले होते. त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली ( Chandrakant Patil On Wine Selling ) आहे. शेतकऱ्यांचे नाव पुढे करून किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देत आहात. शेतकऱ्यांच्या पोरांना दारूच्या नादी लावायचे आहे का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
कोल्हापूरात प्रसारमाध्यमांनी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या पिकांना आणि फळांना पहिला भाव द्या मग इतर विचार करा. आजपर्यंत शेतकऱ्यांचे अतिवृष्टी गारपीटने झालेल्या नुकसानीची भरपाई दिली नाही तसेच कर्जमाफी सुद्धा अर्धवट ठेवली. हे सगळं राहील बाजूला आणि तुम्ही शेतकऱ्यांचे नाव पुढे करून किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देत आहात. शिवाय शेतकऱ्यांच्या पोरांना दारूच्या नादी लावायचे आहे का,"असेही पाटील यांनी म्हटलं.
प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारखे नेतृत्वच होणे नाही