महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्याच्या मोहिमेचे चंद्रकांत पाटलांनी केले होते नेतृत्व - श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवणे

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tiranga Campaign सुरू आहे याच पार्श्वभूमीवर श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा Tiranga at Lal Chowk in Srinagar फडकविण्याची नेमकी काय होती मोहीम आणि यामध्ये चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांचे असलेले योगदान यावर एक नजर

Chandrakant Patil
Chandrakant Patil

By

Published : Aug 14, 2022, 9:37 PM IST

Updated : Aug 14, 2022, 9:45 PM IST

कोल्हापूरभाजपाचे नेते आणि नूतन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे गेल्या केवळ 18 वर्षांपासून राजकारणात आहेत मात्र त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ते अनेक वर्षे सक्रिय होते अनेक महत्वाची पदे सुद्धा त्यांनी भूषविली आहेत याच विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी एका महत्त्वाच्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. ती मोहीम म्हणजे श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवणे होय सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tiranga Campaign सुरू आहे याच पार्श्वभूमीवर श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा Tiranga at Lal Chowk in Srinagar फडकविण्याची नेमकी काय होती मोहीम आणि यामध्ये चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांचे असलेले योगदान यावर एक नजर

प्रतिक्रिया देताना मंत्री चंद्रकांत पाटील


तिरंगा फडकविण्यासाठी चंद्रकांत पाटलांची त्यावेळची धडपड :अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून नूतन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याकाळी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपला चांगलाच ठसा उमटवला होता. त्यामुळे त्यांना वेळोवेळी अनेक पदांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1990 ते 1994 या कालावधीत त्यांच्यावर राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी सांभाळताना चंद्रकांत पाटील यांनी पूर्वोत्तर राज्यातील आंतरछात्र जीवन दर्शनी या प्रकल्पाला आगळे वेगळे स्थान प्राप्त करून दिले. सन 1990 मध्ये अभावीपच्या वतीने काश्मीर प्रश्नावर देश पातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी चलो काश्मीर नावाने मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गतच सुमारे 20 हजार तरुण श्रीनगरमधील लाल चौकात भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी जाण्याची योजना होती. या मोहिमेचे नेतृत्व चंद्रकांत पाटील हेच करत होते. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत तरुणांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी ठीक ठिकाणी मान्यवरांची भाषणे होत होती. या माध्यमातून हे मान्यवर काश्मीरमधील भीषण परिस्थितीचे वास्तव तरुणांसमोर मांडत होते. त्यानंतर या सर्व तरुणांनी श्रीनगरकडे कुच केल्यानंतर या सर्वांना उदमपूर येथे अटक झाली. त्यानंतर स्वतः चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांनी आपला मोर्चा राजधानी दिल्लीकडे वळवला होता आणि राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी सुद्धा याची दखल घेतली आणि या विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले. चर्चेच्या आमंत्रणानंतर विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ घेऊन चंद्रकांत पाटील पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या भेटीसाठी गेले. या भेटीमध्ये सखोल चर्चेनंतर चंद्रकांत पाटील यांनी आपल्याकडील तिरंगा ध्वज पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना देऊन हा तिरंगा श्रीनगरमधील लाल चौकात फडकवण्याची विनंती केली होती. आजही चंद्रकांत पाटील या मोहिमेबाबत नेहमीच अनेकांना अभिमानाने सांगताना पाहायला मिळतात. शिवाय आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील 370 कलम हटवले असल्याचेही ते सांगतात.

हेही वाचा -Indian Independence Day स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कृष्णा नदीत पार पडली तिरंगा जल दौड

Last Updated : Aug 14, 2022, 9:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details