Chandrakant Patil on Presidents Rule : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले.. - चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Union Minister Amit Shah) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर महाआघाडीच्या नेत्यांकडून अमित शाहांना आता जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत (Chandrakant Patil on Presidents Rule) एक वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोल्हापूर - राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी ( Chandrakant Patil on Presidents Rule) जी कारणे लागतात त्यासाठीची कोणतीच कारणं राज्य सरकारने शिल्लक ठेवलेली नाहीत. राज्यपालांनी याबाबत जे होतंय ते होऊ दे म्हणून बाजू काढली आहे. मात्र हे सरकार राज्यपालांचे अधिकार कमी करत सुटले आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, राज्यपाल आणि सरकार यांच्यामधील वादाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा समोर आला आहे.