कोल्हापूर - राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर चहूबाजूंनी संकट येत आहेत. ईडी आणि अन्य केंद्रीय यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करून काही साध्य झाले नाही. आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मागणीनुसार त्यांच्यावरील खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असा आदेशच सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे ही त्यांची नाचक्की झाली आहे. कोर्टात जाऊन थपडा खायच्या, नाचक्की करून घ्यायची ही उद्धव ठाकरे सरकारची आता सवयच झालेली आहे अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उंदीर म्हणजे कोण - सत्तेसाठी केलेल्या तडजोडींचे फळ आता शिवसेनेला भोगावे लागणार आहे. (Critical tweet of Chandrakant Patil) अर्थात, परमबीर सिंग यांच्या सीबीआय चौकशीमुळे जहाज बुडण्याच्या भीतीने बरेच उंदीर सैरावैरा धावू लागले, तरी आश्चर्य वाटायला नको असे चंद्रकांत पाटलांनी येणाऱ्या काळात असे काहीतरी होईल याचा अप्रत्यक्ष अंदाजच बांधला आहे. दरम्यान, हे उंदीर म्हणजे कोण आणि कुठे उड्या मारणार याबद्दल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
सीआयडी चौकशीने काही होणार नाही - सीआयडी चौकशीने काही होणार नाही असही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. माझा महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास नाही. (Chandrakant Patil criticizes Mahavikas Aghadi) मात्र, महाराष्ट्र पोलिसांमधले बरेच अधिकारी जर त्यात अडकले असले तर त्यांची चौकशी ते कसे करणार? त्यामुळे सीबीआय चौकशी मागायला आम्ही कोर्टात जाणार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. याचबरोबर अनिल देशमुख यांच्या वेळीही त्यांनी अशीच टाळाटाळ केली. शेवटी हायकोर्टाने आदेश दिला त्यानुसार सीबीआय चौकशी सुरू झाली अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली आहे.
तर आम्ही गप्प बसणार नाही - हायकोर्टाच्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांना कोर्टात जायला लागले. त्यामुळे पेन ड्राईव्ह विषयामध्ये जर ते सीआयडीची चौकशी लावून तोंडाला पाने पुसणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, परमबीर सिंग यांचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर आता भाजप नेते आणि महाविका आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलेच राजकीय युध्द रंगले आहे.
हेही वाचा -Sanjay Raut Exclusive : भाजपबरोबर भविष्यात युती होणार नाही, संजय राऊत यांनी हे सांगितले कारण