महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil Criticized Sanjay Raut : राऊत हे शरद पवारांच्या पॅरोलवर असून, शिवसेना संपवतायेत -चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील संजय राऊत टीका

संजय राऊत (Sanjay Raut Press) यांनी मंगऴवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारसह राज्यातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडतील, असे ते म्हणाले.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील

By

Published : Feb 16, 2022, 4:32 PM IST

Updated : Feb 16, 2022, 5:21 PM IST

कोल्हापूर -संजय राऊत (Sanjay Raut Press) यांनी मंगऴवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारसह राज्यातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे पवारांच्या पॅरोलवर असून, शिवसेना संपवत आहेत. मात्र, हे उद्धव ठाकरे यांना कधी लक्षात येणार, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राऊतांच्या पत्रकार परिषदेचा खरपूस समाचार घेतला. ते आज कोल्हापुरात बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
  • संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडतील -

उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. मात्र, संजय राऊत म्हणाल्याप्रमाणे मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना घेऊन बुडणार अशी टीका केली होती. मात्र, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची काळजी करू नये. यासाठी आम्ही समर्थ आहोत, असा सल्ला पाटलांनी दिला आहे. याउलट संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडतील, असे ते म्हणाले.

  • पत्रकार परिषदेत राऊतांनी एकपात्री नाटक केले -

पारदर्शकपणे काम करा, नाहीतर कधी काय होईल सांगता येत नाही. नंतर अशी पत्रकार परिषद घेत त्रागा करून घेण्यात काय अर्थ नाही. झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईतून शक्ती कमी पडली म्हणून नाशिकमधून लोकं आणल्याचे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. जर किरीट सोमैया यांनी तुमच्यावर आरोप केले असतील तर घटनेप्रमाणे तुम्ही कोर्टात जाऊ शकता व लढू शकता. मात्र, हे सर्व सोडून संजय राऊत यांनी शक्ती प्रदर्शन केले आहे. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी एकपात्री नाटक केले असून, यामध्ये त्यांनी सर्व भीती, त्रागा यासारखे सर्व पात्र दाखवले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच आताची भाजपा ही अॅक्शनला रिअॅक्शन देणारी आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे कुठे होते? -

पत्रकार परिषद घेण्यासाठी शिवसेना भवन हे योग्य नाही हे उद्धव ठाकरे कसे समजत नाहीत. पत्रकार परिषद घेतली मात्र या पत्रकार परिषदेला मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे का उपस्थित नव्हते? ठाकरे कुटुंबियांवर आरोप होत असताना संजय राऊत शांत होते. मात्र, जेव्हा स्वतःवर आरोप होऊ लागले तेव्हा ते उठून बसले आहेत. जोपर्यंत तुमच्यापर्यंत येत नव्हतं तोपर्यंत सगळे आलबेल होतं. मात्र, संजय राऊत यांच्या गळ्याशी आलं तर मी सगळी शिवसेना वापरणार अशी त्यांची भूमिका असल्याचे देखील पाटील म्हणाले. जे दोषी असतील ते जेलमध्ये जातील. मात्र, गल्लीतले दोन मंडळ येऊन भांडल्यासारख काय करताय, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

Last Updated : Feb 16, 2022, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details