कोल्हापूर- कोल्हापुरातील महागणपती समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ढोल वादक पथकातील सदस्य असे तब्बल एकूण 125 जणांचा समावेश आहे. या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शुक्रवारी बंदी असताना देखील पापाची तिकटी येथून गणेशमूर्तीच्या आगमनाची मिरवणूक काढल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोल्हापुरातील महागणपती मंडळाने केला कोरोना नियमांचा भंग; मिरवणूक काढल्याने १२५ जणांवर गुन्हा - महागणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
कोल्हापुरातील मानाचा आणि महागणपती समजला जाणारा छत्रपती शिवाजी चौकातील तरुण मंडळाने कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांचा भंग करत गणेश आगमनाची मिरवणूक काढली. ढोल वाद्यांच्या पथकासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात माजी महापौर नंदकुमार वळंजू यांचादेखील समावेश आहे.
कोल्हापुरातील मानाचा आणि महागणपती समजला जाणारा छत्रपती शिवाजी चौकातील तरुण मंडळाने कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांचा भंग करत गणेश आगमनाची मिरवणूक काढली. ढोल वाद्यांच्या पथकासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात माजी महापौर नंदकुमार वळंजू यांचादेखील समावेश आहे. वळंजू यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ढोल वादक पथकातील 125 जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच राजारामपुरी परिसरात कोरोना नियमाचा भंग करून गर्दी करत मिरवणूक काढल्याप्रकरणी दोन मंडळावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.