महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shiv Sena MP : शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबंस्त, एकनाथ शिंदे गटात होणार सामील? - कॉल रेकॉर्ड

एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी होण्यास इच्छुक असलेले (Shiv Sena MP) खासदार धैर्यशील माने (Darhysheel Mane) यांचा कॉल रेकॉर्ड (call record) समोर आला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, माने यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Darhysheel Mane
खासदार धैर्यशील माने

By

Published : Jul 19, 2022, 2:14 PM IST

कोल्हापुर : एकनाथ शिंदेच्या गटाला आता खासदार ही जाऊन मिळत आहेत. यामध्ये कोल्हापुरातील 2 खासदारांचा समावेश आहे. हातकणगले लोकसभेचे खासदार (Shiv Sena MP) धैर्यशील माने (Darhysheel Mane) आणि संजय मंडलिक हे याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करणार होते. याअगोदरच खासदार धैर्यशील माने यांचा कॉल रेकॉर्ड (call record) समोर आला आहे.

माने यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात :या कॉल रेकॉर्ड मध्ये माने एका कार्यकर्त्यांशी बोलत आहेत. या संभाषणावरून खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटाकडे जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे आता कोल्हापुरातील रुईकर कॉलनी मध्ये राहात असलेल्या खासदार धैर्यशील माने यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जर शिवसैनिक आक्रमक झाले. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आलेला आहे.

आमच्याकडे 12 नव्हे तर 18 खासदार :शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात आहेत. आज (मंगळवार) दिल्लीत शिवसेनेचे 12 खासदार ( MP of Shiv Sena ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना समर्थन घोषित करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) दिल्लीत दाखल झाले आहेत. रात्री अकराच्या सुमारास ते विमानाने दिल्लीला निघाले व दीड वाजता दिल्लीत पोहोचले. मंत्रिमंडळ विस्ताराचाही विषय अद्याप प्रलंबित आहे. भारतीय जनता पक्षाच्या ( Bjp ) ज्येष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री भेट घेण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत मध्यरात्रीनंतर दाखल झाले. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेचे खासदार आम्हाला भेटतील. आमच्याकडे 12 नव्हे तर 18 खासदार आहेत. आमचा आमच्या न्यायव्यवस्थेवर अढळ विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, असे त्यांनी सांगितले.



हेही वाचा : Maharashtra Breaking News : शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिक कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

ABOUT THE AUTHOR

...view details