कोल्हापूर -आमदार चंद्रकांत जाधव ( MLA Chandrakant Jadhav Death ) यांचे आकस्मिक निधन दुर्दैवी घटना आहे. त्यांच्या जाण्याने कोल्हापूरच्या राजकारणातील एक निगर्वी, मितभाषी, सुस्वभावी आणि साध्या राहणीच्या व्यक्तिमत्वाला आपण मुकलो, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. शिवाय माझ्या जवळच्या मित्राला दुरावलो, असे म्हणत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
- 'चंद्रकांत जाधव गेले यावर विश्वासच बसत नाही'
शोक व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सकाळी चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याची बातमी जेंव्हा कानावर पडली तेंव्हा यावर विश्वासच बसला नाही. जाधव हे अतिशय गरिबीतून पुढे आले आहेत. त्यांनी उद्योग क्षेत्रात तर उल्लेखनीय काम केले आहेच शिवाय अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. याबरोबरच फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. राजकारणात सुद्धा त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि त्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात भाजपा सहभागी असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
- 'खिलाडूवृत्ती जपत फुटबॉल खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना सहाय्य'