महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक; सरस्वती पाटील यांचे निधन - कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांच्या आईंचे निधन

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आई सरस्वती पाटील ( Chandrakant Patil mother Saraswati Patil ) यांचे वयाच्या 91 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्यावर आज ( रविवारी ) २४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सरस्वती पाटील
सरस्वती पाटील

By

Published : Jul 24, 2022, 6:37 PM IST

कोल्हापूर -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील ( Chandrakant Patil mother Saraswati Patil ) यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली (सातारा, आजरा) व त्यांचा परिवार आहे.

पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार अंत्यसंस्कार :अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांतदादा पाटील यांच्या आईंनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच आमदार पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे. सरस्वती बच्चू पाटील यांच्यावर आज ( रविवारी ) २४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा -Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या 'शिवसंवाद'मुळे बंडखोर आमदारांचे धाबे दणाणले?

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details