कोल्हापूर -राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला ( Chandrakant Patil On Shivsena ) लगावला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. परंतु, राज्यात इतके प्रश्न आहेत की मुख्यमंत्र्याचा चार्ज दुसऱ्या कोणाकडे तरी देण्याची गरज आहे. मग ते कोणाकडेही द्या आमचं काही म्हणण नाही, असेही ( Chandrakant Patil On Cm Uddhav Thackeray ) ते म्हणाले. ते कोल्हापूरात बोलत होते.
पंतप्रधानांच्या कोरोना आढावा बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीमुळे उपस्थित राहू शकले नव्हते. त्या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना बोलू दिले नाही. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, "तब्येत बिघडणे हे कोणत्याही व्यक्तीच्या हातामध्ये नसते यामुळे या बद्दल बोलने हे भारतीय संस्कृती नाही. आपण त्यांना लवकर बरे होण्यास शुभेच्छा देऊ. मात्र बाराशे कोटीची जनता असलेल्या महाराष्ट्र राज्यात अनेक प्रलंबित गंभीर प्रश्न आहेत. याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी बरे होईपर्यंत आपला चार्ज दुसऱ्या कोणाकडे तरी देण्याची गरज आहे. मग ते कोणी का असेना आमच काहीही म्हणन नाही."
"सध्या महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न आहेत दोन दिवसांखाली झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये देशातील सर्व मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना मग ते राजेश टोपे असो किंवा गृहमंत्री वळसे-पाटील यांना व्यवस्थित मुद्दे मांडता येणारच नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत. यामुळे चार-चार वेळा त्यांची प्रतिक्रिया विचारत असतात," असेही पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून...