कोल्हापूर - केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र सरकारवर आरोप करत महाराष्ट्र सरकार म्हणजे सर्कस असल्याची उपहासात्मक टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्याकडे सर्कस आहे, त्यामध्ये प्राणी आहेत, मात्र विदूषक नसल्याची खोचक टीका केली होती. याचाच समाचार आज चंद्रकांत पाटील यांनी घेतला. ते म्हणाले, शरद पवार यांनी त्यांच्याकडे सर्कस आहे आणि त्यामध्ये प्राणी आहेत हे मान्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे हे पवारांनीच म्हटले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
'शरद पवारांनीच मान्य केले, महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे'
केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र सरकारवर केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. या दोघांच्या शाब्दिक वादामध्ये आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेत पवारांवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र सरकारवरती केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. या दोघांच्या शाब्दिक वादामध्ये आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेत पवारांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. आपणाला शरद पवारांबद्दल आदर असून, दिल्लीत जाऊन अनेकवेळा त्यांचे मार्गदर्शन घेतले असल्याचेही पाटील यांनी यावेळी म्हटले.
यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापेक्षा शरद पवारांविषयी मला जास्त आदर असल्याचेसुद्धा म्हणायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत. आज आपल्या वाढदिवसानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी शहरातील विविध भागांमध्ये जीवनावश्यक वस्तू, वृक्षारोपण, मास्क, सॅनिटायझर आदीचे वाटप केले. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.