कोल्हापूर -राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तयार आहोत, पण त्यासाठी महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार मागे घ्यावा. आमचा ठाम विश्वास आहे आम्ही तीनही जागा जिंकणार आहोत. तसे नियोजन सुद्धा झाले आहे. राज्यसभा निवडणुकीत ( Rajya Sabha Election 2022 ) मोठ्या पक्षाचा मोठा नेता देखील पडू शकतो, असे सूचक विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil ) यांनी केले आहे. ते कोल्हापूरात बोलत होते. पाटील यांनी नाव घेता संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर हा निशाणा साधला आहे. शिवाय भाजपाच्या तिन्ही जागा निवडून येतील, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.
Chandrakant Patil Kolhapur : 'राज्यसभा निवडणुकीत मोठ्या पक्षाचा मोठा नेताही पडू शकतो' - राज्यसभा निवडणूक 2022
राज्यसभा निवडणुकीत ( Rajya Sabha Election 2022 ) मोठ्या पक्षाचा मोठा नेता देखील पडू शकतो, असे सूचक विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil ) यांनी केले आहे. ते कोल्हापूरात बोलत होते. पाटील यांनी नाव घेता संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर हा निशाणा साधला आहे.
'आम्ही घोडेबाजार केला नाही' :राज्यसभेसाठीच्या जागा आम्ही शंभर टक्के जिंकणारच, असा विश्वास सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत त्यांच्या पक्षाचा मोठा उमेदवार सुद्धा पडू शकतो, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. भाजपाने संभाव्य घोडेबाजार थांबवावा, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर बोलताना ते म्हणाले आम्ही कधीही घोडेबाजार केला नाही. आम्हाला ते माहिती सुद्धा नाही. ज्यांना याबद्दल माहिती आहे तेच वारंवार घोडेबाजार घोडेबाजार करत सुटले आहेत, असा पलटवार सुद्धा त्यांनी केला. आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतो. लोकांना विकासाबद्दल आश्वस्त करत असतो. आमच्या कामावरच आम्ही मते मागत असतो आणि सर्वजण देत असतात, असेही पाटील यांनी म्हटले.