कोल्हापूर -पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण आता चांगलेच तापु लागले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजही त्यांनी महाविकास आघाडीला डीवचत राष्ट्रवादीच सगळं सरकार चालवत असून काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फक्त गाड्या फिरवण्याचे काम सुरू असल्याची बोचरी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नसून पोलिसांचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करून घेण्याचे काम चालू आहे, असेही ते म्हणाले.
'सगळ सरकार राष्ट्रवादी चालवतयं' :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका सभेत बोलताना असे म्हणाले, की राज्याचा अर्थमंत्री मी आहे. त्यामुळे निधी वाटपाच्या चाव्या ह्या माझ्याकडे आहेत. मीच निधी दिला नाही तर तो काय घंटा करणार. मात्र आता या विधानानंतर विरोधक मात्र महविकास आघाडीला चांगलेच डिवचताना दिसत आहेत. आज कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या प्रचाराप्रसंगी 'चाय पे चर्चा' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनी बोलेले अत्यंत योग्य असून महाविकास आघाडी सरकार हे राष्ट्रवादी चालवत आहे. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फक्त गाड्या फिरवण्याचे काम सुरू असल्याची टीका केली आहे.