महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 16, 2022, 5:04 PM IST

Updated : Jun 16, 2022, 8:42 PM IST

ETV Bharat / city

Biggest Butterfly Find in Kolhapur : राधानगरी अभयारण्यात सर्वात मोठ्या फुलपाखराचे दर्शन

देशातील सर्वात मोठ्या फुलपाखरूचे राधानगरीत दर्शन झाले ( Biggest Butterfly Find in Kolhapur ) आहे. सदर्न बर्डविंग ( Troides minos / southern birdwing ) असे या फुलपाखरूचे नाव असून येथील पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून नावारूपाला येत असलेल्या वनविभागाच्या फुलपाखरू गार्डनमध्ये याचे दर्शन झाले. याच फुलपाखराला सह्याद्री बर्डविंग असेही ( Sahyadri birdwing ) म्हणतात.

Biggest Butterfly Find in Kolhapur
राधानगरी अभयारण्यात सर्वात मोठ्या फुलपाखराचे दर्शन

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाच्या बाबतीत सध्या चर्चेत असलेल्या राधानगरी येथे देशातील सर्वात मोठ्या फुलपाखरूचे दर्शन झाले ( Biggest Butterfly Find in Kolhapur ) आहे. सदर्न बर्डविंग असे या फुलपाखरूचे नाव आहे. पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून नावारूपाला येत असलेल्या वनविभागाच्या राधानगरी अभयारण्य फुलपाखरू गार्डनमध्ये याचे दर्शन झाले. याच फुलपाखराला सह्याद्री बर्डविंग असेही ( Sahyadri birdwing ) म्हणतात. याच राधानगरी अभयारण्यात महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू तसेच देशातील सर्वात लहान फुलपाखराची सुद्धा नोंद झालेली आहे.

राधानगरीतील फुलपाखरू गार्डनमध्ये सर्वात मोठ्या फुलपाखराचे झालेले दर्शन

सदर्न बर्डविंग फुलपाखराचा इतका मोठा आकार - सदर्न बर्डविंग फुलपाखरुची देशातील सर्वात मोठे फुलपाखरू म्हणून नोंद आहे. इतर फुलपाखरापेक्षा आकाराने ते कित्येक पटीने मोठे असते. जवळपास 150 ते 200 मिमी इतके असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. वेगवेगळ्या रंगात हे पाहायला मिळते. सद्या वनविभागाच्या कोल्हापूर फुलपाखरू गार्डनमध्ये दर्शन झालेल्या या फुलपाखरु सोनेरी रंगात आणि त्याचे पंख निळसर रंगात असल्याचे पर्यटकांसह इथल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसले. त्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या कॅमेरात कैद केला आहे. हे फुलपाखरू आकाराने इतके मोठे आहे जणू एक लहान पक्षीच गार्डनमध्ये फिरत असल्याचा भास होतो. असे पर्यटकांनी म्हटले आहे.

यापूर्वी दिसले होते सर्वात लहान फुलपाखरू - वनविभागाच्या फुलपाखरू गार्डन मध्ये सध्या विविध प्रजातींची फुलपाखरू पाहायला मिळतात. आजपर्यंत या उद्यानात 55 तर दाजीपूर अभयारण्यात जवळपास 140 हुन अधिक फुलपाखरांची नोंद झाली आहे. यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू 'ब्ल्यू मॉरमॉन'चे सुद्धा दर्शन होत असते तर देशातील सर्वात लहान 'ग्रास ज्वेल' फुलपाखरुची सुद्धा नोंद झाली आहे. हे फुलपाखरू आकाराने केवळ 5 ते 7 मिमी इतके असते अशी माहिती राधानगरी बायसन नेचर क्लबचे उपाध्यक्ष रुपेश बोंबाडे यांनी दिली आहे.

सदर्न बर्डविंग फुलपाखराचे वैशिष्ट्य -सदर्न बर्डविंग हे फुलपाखरू आकाराने मोठे असले तर इतर फुलपाखरांच्या प्रमाणे त्याच्या शेपटीला टोक नसते. हे स्वाँलोटेल कुळामधील असते अशी अभ्यासकांची माहिती आहे. हे फुलपाखरू विशेष करून पावसाळ्यामध्ये पाहायला मिळते. मात्र हे सर्वच वातावरणात जगू शकते अशी याची नोंद आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात सुद्धा हे पाहायला मिळते.

राधानगरीत झाला होता पहिला फुलपाखरु महोत्सव - कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीदार तालुका म्हणून राधानगरी तालुक्याला ओळखले जाते. राजर्षी शाहू महाराजांनी याच राधानगरी येथे राधानगरी धरणाची उभारणी केली. शिवाय याच तालुक्यात दाजीपूर अभयारण्य सुद्धा आहे. ज्यामध्ये विविध प्रकारचे पक्षी तसेच प्राणी आढळतात. विशेष करून गव्यांसाठी या अभयारण्याची खास ओळख आहे. याच राधानगरीमध्ये काही वर्षांपूर्वी फुलपाखरू उद्यान सुरू करण्यात आले आहे. येथील गार्डन मध्ये विविध प्रजातींची फुलपाखरांची नोंद झाली आहे. याच गार्डनमध्ये महाराष्ट्रातील सर्वात पहिला फुलपाखरू महोत्सवही भरविण्यात आला होता. 2015 साली हा महोत्सव भरविण्यात आला होता. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हा तालुका आता महाराष्ट्रभर ओळखला जाऊ लागला आहे. याच खास आकर्षण वनविभागाचे हे फुलपाखरू गार्डन असल्याची माहिती बायसन नेचर क्लबचे अध्यक्ष सम्राट केरकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

हेही वाचा -Bail to Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

हेही वाचा -First Private Train : पहिली खासगी रेल्वे पोहोचली शिर्डीत, स्टेशनवर करण्यात आले स्वागत

हेही वाचा -Vidarbha Rain Update : विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मॉन्सून दाखल; सर्वत्र पावसाचा अंदाज

Last Updated : Jun 16, 2022, 8:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details