महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Menstrual Hygiene Day : मासिक पाळी स्वच्छता दिनी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन - Maharashtra government

दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील 60 लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार ( Maharashtra government decision on menstrual hygiene day ) आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

Menstrual Hygiene Day
मासिक पाळी स्वच्छता दिनी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

By

Published : May 28, 2022, 3:14 PM IST

कोल्हापूर - मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील 60 लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार ( Maharashtra government decision on menstrual hygiene day ) आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

ग्रामीण भागातील महिलांसाठी योजना - मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जागतिक प्रश्न आहे गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने व सफाई कमी मुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रियांच्या होणाऱ्या मृत्यू मागे हे सर्वात मोठे कारण असून हा प्रश्न कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील दारिद्र रेषेखालील महिलांसाठी नाममात्र रुपयांमध्ये ग्रामविकास खात्याकडून ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

जगातील व राज्यातील आकडेवारी - भारतात दरवर्षी 120 दशलक्षाहून अधिक महिलांना मासिक पाळीचा त्रास आणि आजारांचा सामना करावा लागतो. भारतात तीनशे वीस दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या महिला स्त्रियांपैकी केवळ 12 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. यामुळे चार वर्षे भारतात 60,000 होऊन अधिक स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोगामुळे होणारा मृत्यू पैकी दोन तृतीयांश मृत्यू मासिक पाळी बद्दलच्या समजूतीमध्ये निष्काळजीपणामुळे होतो. हीच आकडेवारी महाराष्ट्रात पाहायला गेले तर केवळ 66 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. याबद्दलही शहरी भागाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील फक्त 17.30 टक्के स्त्रियांपर्यंत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा पोहोचत असते. या समस्येच्या मुळाशी गेले असता सॅंडल तेरी पेड वापरण्याबाबत जागृकता नसणे. सॅनेटरी पॅड खरेदी करण्याची समस्या उद्भवले, अशा अनेक प्रश्नांना स्त्रिया सामोरे जात असतात.

दारिद्र रेषेखालील 19 वर्षावरील सर्व महिलांसाठी योजना -सध्या महाराष्ट्रात राज्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त 19 वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्राम विकास विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील सर्व युवती व महिलांना या समस्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना व बचत गटांमधील महिलांना एक रुपये नाममात्र किमतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये -

  1. राज्यातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिला व आरोग्य विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेतील सर्व महिला वगळून इतर दारिद्र्यरेषेखालील सर्व वयोगटातील युवती व महिलांना दर महिना एक रुपये नाममात्र शुल्कात 10 सॅनिटरी नॅपकिन असलेले एक पाकीट महिलांना मिळणार.
  2. स्थानिक पातळीवर गाव स्तरावरच गावातील ग्राम संघामार्फत महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार.
  3. शासन स्तरावर दर करार करण्यात येणार.
  4. योजनेअंतर्गत महिलांना सॅनिटरी नेपक किट चा वापर करण्याबाबत वैयक्तिक स्वच्छते संदर्भात जागृती व प्रचार करणार
  5. सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थापन व विल्हेवाट
  6. या योजनेत जवळपास 60 लाख पेक्षा जास्त लाभार्थी महिला असल्याने सॅनिटरी नाक्यांचे विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गाव स्तरावर मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीन मार्फत महिलांनी सॅनिटरी नॅपकिन ची विल्हेवाट लावावी यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहेत. ही सर्व मशीन जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या स्वनिधीतून तसेच शासकीय निधी देणग्या तसेच सीएसआर निधीच्या माध्यमातून बसविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

या योजनेवर एकाने व्यक्तींसाठी अंदाजे चार रुपये गृहीत धरल्यास लाभार्थ्यांची संख्या 60 लाख अंदाजे असून वार्षिक 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -NCP Nagpur Agitation : महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमान चालीसा पठण आंदोलन

हेही वाचा -Punjab : पंजाब सरकारचा मोठा निर्णय.. ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढली

हेही वाचा -Clean Chit Given to Aryan Khan : एनसीबीची कार्यपद्धती चुकीची, अधिकाऱ्यांना करावी शिक्षा : शिवसेना प्रवक्ते आंनद दुबेंची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details